केज : तालुक्यातील पिंपळगाव घोळवे पाटीवर केज पोलिसांनी सोयाबीन चोरट्यास ताब्यात घेतले. सदरील आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवून सोयाबीनचे दोन पोते घेऊन जात होता. पोलीसांनी त्याला पाहताच त्याची कसून चौकशी केली.यावेळी हा प्रकार समोर आला. दिनांक २९ जुलै रोजी पहाटे २:०० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.सुरेश उर्फ तायडया शिवराम शिंदे वय ४० वर्षे रा.घोळवे पिंपळगाव ता. केज असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, हवालदार अशोक थोरात, जोगदंड,जीपचालक पो.ना.हनुमंत गायकवाड हे अमावस्या असल्याने केज ठाणे हद्दीत शासकीय जीपमधून रात्रीच्या गस्तीवर होते.घोळवे पिंपळगाव फाट्याच्या पुढे केज ते बीड जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक इसम सोयाबीनचे अर्धवट भरलेले दोन पोते रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात ओढत नेत असताना मिळून आला. चौकशीअंती त्याने त्याचे नाव सुरेश उर्फ तायडया शिवराम शिंदे असे पोलिसांना सांगितले. सदर इसमाकडून अंदाजे ७० किलो सोयाबीन अंदाजे किंमत ४९०० रुपये जप्त करण्यात आले.पोलिसांनी दोन पंच समक्ष जप्ती पंचनामा करून जप्त करून माल ताब्यात घेतला.याप्रकरणी जमादार उमेश आघाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.या आरोपीकडून यापूर्वीचे अनेक गुन्हे उघडकीस येतील असा पोलिसांना अंदाज आहे.
सोयाबीन चोरणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात
RELATED ARTICLES