केज : पत्नी व तीन मुलासह सासुरवाडीला आलेला जावई कुणालाही काही न सांगता बेपत्ता झाला असल्याची तक्रार सासऱ्याने पोलीस ठाण्यात केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक ७ जुलै रोजी परळी येथील सतीश विष्णुदास वाधवणे व त्यांची पत्नी जया हे त्यांच्या तीन मुलासह साळेगाव ता.केज येथे सासुरवाडीला आले होते. ते सर्वजण दोन आठवडे साळेगाव येथे राहिले आणि दिनांक २२ जुलै रोजी पहाटे सतीश विष्णुदास वाधवणे हे अचानक कोणालाही न सांगता आणी त्यांचा मोबाईल पत्नीकडे देऊन बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध नातेवाईकांकडे घेतला असता ते आढळून आले नाहीत.म्हणून त्यांचे सासरे ज्योतीकांत कलसकर यांनी केज पोलीस ठाण्यात जावई सतीश वाधवणे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
सासरवाडीला आलेला जावई अचानक झाला बेपत्ता
RELATED ARTICLES