ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिचा नवरा सासू सासरे यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,सांगवी सारणी येथील सुनिता हिचे लग्न दि.१९ जानेवारी २०२० रोजी धारूर तालुक्यातील अशोक रंजीत मैंद यांच्या सोबत झाले. लग्नानंतर आठ महिने तिला चांगले नांदवले. नंतर तिचा नवरा व कुटुंबातील सर्वजण तिला तू अपंग आहेस. तुला काम येत नाही. तसेच तुझे लग्न पूर्वीच अशोक मैंद याच्याशी शारीरिक संबंध आले असल्याने पोलीस कारवाई टाळण्यासाठी तुमचे लग्न केले.असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला मारहाण केली.तसेच ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपयाची मागणी केली. तिचे वडिलांनी पैसे देऊनही मारहाण करून तिच्या १४ महिन्याच्या मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली.या प्रकरणी सुनिता मैंद हिने ३१ मे २०२२ रोजी तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध केज येथील कौटुंबिक हिंसाचार व महिला समुपदेशन केंद्र केज येथे तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून व तिने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिचा नवरा अशोक रंजीत मैंद,सासू रत्नमाला रंजीत मैद, सासरे रंजीत लक्ष्मण मैद, दिर अजित रणजीत मैंद, चुलत सासरा संजीवन लक्ष्मण मैद सर्व राहणार मंडळी तालुका धारूर आणी नणंद राधा शेषेराव बिक्कड,नंदावे शेषराव काशिनाथ बिक्कड राहणार सांगवी तालुका केज या आठ जणांच्या विरुद्ध गु.र.नं.३१६/२०२२भा.द.वि. (४९८(अ),३२३,५०४,५०६ आणी ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.
ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये ; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
RELATED ARTICLES