बीड : बाल हक्क संरक्षण संघाची नुकतीच कार्यकारणी जाहीर झाली.बालकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारा एकमेव संघ बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र बीड तालुका अध्यक्ष पदी मा. संभाजी (अविनाश)भोसले यांची नियुक्ती संघाचे संस्थापक / प्रदेशाध्यक्ष हर्षल पटवारी यांच्या हस्ते संस्थापक सरचिटणीस प्रा. ज्ञानदेव इंगळे,संस्थापक उपाध्यक्ष डाॅ.भालचंद्र कदम यांच्या उपस्थितीत दि.२५ जुलै सोमवार रोजी बीड येथील शासकीय विश्रागृहात घेण्यात आलेल्या बीड शहर व जिल्हा पद नियुक्ति सोहळ्यात करण्यात आली.बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य चा मुख्य उद्देश बालकांच्या अधिकाराच रक्षण करून बालकांचे बालपण वाचवण्यासाठी बाल स्नेही समाजाची निर्मिती करणे हा आहे. या अंतर्गत बाल कामगार, बाल भिक्षेकरू, विधी संघर्शित बालक, काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक यांच्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा संघाचा मानस आहे. बालकांसंबंधित विविध विषयांवर सरकार व अधिकाऱ्यांच लक्ष वेधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघ सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन हर्षल पटवारी यांनी केले. बीड जिल्हा व तालुक्यांची कार्यकारणी जाहीर ______ बीड जिल्हा पदनियुक्ती कार्यक्रमात बीड जिल्ह्य़ातील पदाधिका-यांची कार्यकारीणी नियुक्ती पत्र देऊन जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत बीड जिल्हाध्यक्ष (शहरी)शेख युनूस च-हाटकर, बीड जिल्हाध्यक्ष (ग्रामीण )रहेमान सय्यद, बीड जिल्हाउपाध्यक्ष (ग्रामिण)संजय सानप, बीड बीड जिल्हाउपाध्यक्ष (शहरी)बलभीम उबाळे,जिल्हा सचिव (शहरी)सय्यद आबेद ,बीड जिल्हा सचिव (ग्रामिण)हमीदखान पठाण तर बीड जिल्हा कार्याध्यक्ष पदी बालाजी जगतकर ,पाटोदा तालुकाध्यक्ष सतिश गर्जे,तर बीड तालुका सचिव पदी दिनेश मुळे यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
बाल हक्क संरक्षण संघ बीड तालुका अध्यक्ष पदी ; संभाजी भोसले
RELATED ARTICLES