आष्टी : तालुक्यातील वंजारवाडी. बोरडवाडी. लाटेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीतील नगर जिल्हा सरहद्दी वर असलेली दुर्गम भागातील ही बोरडवाडी. या वाडीची लोकसंख्या जेमतेम 600च्या जवळपास. या वाडीत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतची शाळा आहे.गेल्या अनेक वर्ष्यापासून अंगणवाडी येथे भरते. या अंगणवाडीच्या विध्यार्थ्यांची पट संख्या जवळपास 35ते 40एवढी आहे. या अंगणवाडीला इमारत नसल्याने ही अंगणवाडी शाळा रोज उघड्यावरच भरते.या कडे गेली अनेक वर्ष सर्वच राजकीय लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा पं सदस्य दादा पवळ यांनी केला आहे.सध्या शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे. शिक्षणावर सामान्य पालक हजारो रुपये खर्च करून आपल्याला पाल्यांना चांगल्या शाळेत शिकवतो. तर शासनही लाखो रुपये निधी शाळा. वर्ग खोल्या बांधकामासाठी खर्च करत असते. व लोकप्रतिनिधीचा लाखो रुपयांचा निधी शाळा बांधकामासाठी वापरता येतो. पण लोकप्रतिनिधी त्यांच्या स्थानिक विकास निधी इमारती बांधण्यासाठी न देता सामाजिक सभागृह. सभामंडपासाठी देण्यात धन्यता मानतात. पण बोरडवाडी अंगणवाडी इमारत नसल्याने उघड्यावरच ज्ञानर्जन करणाऱ्या चिमुकल्याणकडे या लोकप्रतिनिधी चे लक्ष कधी जाणार? येथे लवकरात लवकर अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी लोकप्रतिनिधीनीं शासन स्थरावरून निधी उपलब्ध करून द्यावा.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा पं सदस्य दादा पवळ. शिवनाथ बोराडे. देविदास बोराडे. दादा बोराडे. अविनाश बेद्रे. मोहन बोराडे. युवराज बोराडे. संदीप पवार आणी अंगणवाडी च्या ताई आशा कोल्हे. सुनीता बोराडे यांनी केली आहे. आष्टी तालुक्यात 395अंगणवाड्या आहेत. त्यापैकी 165अंगणवाड्याला स्वतःच्या इमारती आहेत. दर वर्षी दोन चार अंगणवाडी इमारती बांधण्यासाठी निधी उपलब्ध होतो. बालविकास अधिकारी सानप साहेब यांना विचारणा केली असता. ज्या गावात अंगणवाडी इमारत नाही. त्या ठिकाणी इमारती प्रतिमहा 1000रुपये प्रमाणे भाड्याने घेण्याच्या तरतुदी आहेत. या पुढे जास्तीत जास्त अंगणवाडी इमारती बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे बालविकास अधिकारी मा उद्धव सानप यांनी सांगितले आहे.
अंगणवाडीस इमारत नसल्याने शाळा रोज उघड्यावरच
RELATED ARTICLES