HomeUncategorizedमहिलांशी उद्धटपणाचे वर्तन करणाऱ्या उपकार्यकारी अभियंत्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करा

महिलांशी उद्धटपणाचे वर्तन करणाऱ्या उपकार्यकारी अभियंत्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करा

केज : तक्रार करण्यास गेलेल्या माजी सैनिकाच्या पत्नीसह अन्य दोन महिलांशी उद्धटपणाचे वर्तन करत त्यांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पोलीस बोलावत त्यांना कार्यालयाबाहेर हाकलणाऱ्या उपकार्यकारी अभियंत्यांवर महिलांची मानहानी व अवमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास निलंबित करण्यात यावे व त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसंग्राम महिला आघाडी संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक २५ जुलै रोजी केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून सदर उपकार्यकारी अभियंत्यांवर कार्यवाही न केल्यास साडीचोळीचा आहेर करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .शिवसंग्राम महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार दुलाजी मेंढके यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केज शहरातील धारूर रोड परिसरातील माजी सैनिकाच्या पत्नी मनीषा शिंदे व मीरा थोरात, यांच्यासह काही महिला रिकाम्या जागेतील विद्युत खांब हलविल्याने त्यांच्या घराजवळून अकरा केव्हीची विद्युत तार जाऊ लागल्याने याची तक्रार करण्यासाठी १९ जुलै रोजी उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांच्याकडे गेल्या होत्या. मात्र त्यांनी त्या महिलांचे काही एक ऐकून न घेता महिलांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याशी उद्धटपणाचे वर्तन करत त्यांचा अवमान करत पोलीस बोलावून त्यांना कार्यालयाबाहेर हाकलून काढले.त्यामुळे उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांच्यावर महिलांशी उद्धटपणाची वर्तणूक करत त्यांचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केज उपविभागात विद्युत वितरण कंपनीच्या वतीने करण्यात आलेल्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याने त्याची सखोल चौकशी करण्यात यावी केज तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील चार वर्षात डीपी दुरुस्तीसाठी वीज बीला व्यतिरिक्त दहा ते पंधरा हजार रुपये मोजावे लागल्याने शेतकऱ्याची आर्थिक लुबाडणूक करण्यात आली आहे. केज शहरातील बीड रोड परिसरात मागील दोन वर्षापूर्वी डीपी बसवला मात्र तारा व विद्युत खांब नसल्याने या भागातील रहिवाशांना त्यांनी नवीन जोडणीसाठी कोटेशन दिले नाही,केज शहरातील दहा व पाच केव्हीचे ट्रान्सफार्मर जळाल्याने सोनीजवळा,तांबवा , तरनळी आदी गावातील शेतीचा वीज पुरवठा बंद आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी व माजी सैनिकाच्या पत्नी मनीषा शिंदे यांच्यासह इतर महिलांशी उद्धटपणाचे वर्तन करत त्यांचा अवमान केल्या प्रकरणी येत्या सात दिवसात उपकार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व महिलांचा अवमान केल्या प्रकरणी विद्युत वितरण कंपनीने जाहीर लेखी माफी मागावी अन्यथा महिलांशी उद्धटपणाचे वर्तन करणाऱ्या उपकार्यकारी अभियंत्यास शिवसंग्राम महिला आघाडी संघटनेच्या वतीनं गांधीगिरी आंदोलन करत साडी,चोळी,व बांगड्याचा आहेर करण्याचा इशारा शिवसंग्राम महिला आघाडी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे या निवेदनावर शिवसंग्राम महिला आघाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मनीषा कूपकार, तालुकाध्यक्षा तेजश्री खामकर ,अस्मिता धेंडे ,सारिका चिकटे,मंगल जाधव,विद्या कांबळे, कल्पना कांबळे,स्वाती सावंत,मनीषा शिंदे, आदींसह शिवसंग्राम महिला आघाडी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments