HomeUncategorizedमा.आ.विनायकराव मेटेंंनी ओबीसी राजकीय आरक्षणाचा आवाज सरकारपर्यंत पोहचवला ; साक्षीताई हंगे

मा.आ.विनायकराव मेटेंंनी ओबीसी राजकीय आरक्षणाचा आवाज सरकारपर्यंत पोहचवला ; साक्षीताई हंगे

बीड : शिंदे -फडणवीस सरकारच्या काळात ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत मिळवून दिल्याबद्दल शिवसंग्रामच्या ओबीसी सेलच्या वतीने शिवसंग्राम भवन येथे आनंदोउत्सव साजरा करण्यात आला .राज्य सरकारचे अभिनंदन व्यक्त करत शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. विनायकराव मेटे यांचे आभारही यावेळी व्यक्त करण्यात आले. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर सातत्याने आवाज उठवणारे आ.विनायकराव मेटे यांनी अधिवेशनामध्ये अभ्यासपूर्ण मत मांडून ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत मिळण्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने पाठिंबा जाहीर करत शिवसंग्रामच्या माध्यमातून वेळोवेळी निवदने आंदोलने केली. तसेच उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांना ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची गरज सातत्याने लक्षात आणून दिली व हा प्रश्न महत्त्वाचा असून गोरगरीब वंचित उपेक्षित बांधवाचे राजकीय प्रतिनिधित्व यामधून हिरावले जाऊ नये यासाठी आपण जातीने लक्ष देऊन ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्टा करावी असे आवाहन शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आले आणि अखेर या बाबीला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवत ओबीसीच्या राजकीय आरक्षण पूर्ववत करत आहोत असा निकाल दिला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चुकीच्या धोरणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले होते. मा.सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू होती परंतु या मविआ सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले होते. परंतु नुकतेच सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले व यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडली व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले खरे पाहता हा संपूर्ण ओबीसी समाजाचा व शिवसंग्रामच्या धोरणाचा विजय आहे असे शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस साक्षीताई हांगे यांनी मत व्यक्त केले आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणामध्ये शिवसंग्रामचा मोलाचा वाटा असून खऱ्या अर्थाने शिवसंग्रामच्या माध्यमातून ओबीसी सेलच्या आरक्षणासंदर्भातील विविध आंदोलनाला यश आले त्याबद्दल शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शिंदे – फडणवीस सरकारचे विशेष आभार व्यक्त करत शिवसंग्राम भवन बीड येथे जल्लोष साजरा करण्यात आला.याप्रसंगी शिवसंग्राम महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस साक्षीताई हांगे यांनी बहुजन नायक मा. आ.विनायकराव मेटे यांचा ओबीसी आरक्षणात मोलाचा वाटा असे मत व्यक्त केले.image.png

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments