गरजूंनी लाभ घेण्याचे आयोजक विजयसिंह पंडित यांचे आवाहन
गेवराई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि साधू वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.24 जुलै रोजी सकाळी 9 वाजता गेवराई येथे मोफत कृत्रिम हात व पाय शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्याहस्ते होणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण, डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिबीराचे आयोजक तथा माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले आहे.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा प्रतिष्ठान व साधू वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.24 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गेवराई शहरातील र.भ.अट्टल महाविद्यालयात मोफत कृत्रिम हात व पाय योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभास पुणे येथील प्रसिध्द बुधरानी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टरांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभास माजी आ.अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, अधिक्षक डॉ.महादेव चिंचोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कदम, सोशल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर खामकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, जयभवानीचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, उपसभापती शाम मुळे, नगरसेवक शाम येवले यांच्यासह मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.शिबीरात दिव्यांगांची तपासणी करून त्यांना कृत्रिम हात व पाय बसविण्यासाठी आवश्यक ती मोजमापे घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सुमारे 40 दिवसांनी प्रत्यक्ष कृत्रिम अवयवाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक समजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. कर्करोग निदान शिबीर, नेत्रशस्त्रक्रिया शिबीर, महाआरोग्य रोगनिदान शिबीर आदी शिबीरांच्या माध्यमातून गेवराईसह बीड जिल्ह्यातील रुग्णांना खूप मोठा फायदा झालेला आहे. कोरोनाच्या काळातही माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठानच्या वतीने कोविड सेंटरही उभारले गेले होते. या कृत्रिम हात व पाय शिबीरामुळे बीड जिल्ह्यातील दिव्यांगांचा फायदा होणार असून गेवराई शहरातील र.भ.अट्टल महाविद्यालयामध्ये होणाऱ्या या शिबीरासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिबीराचे आयोजक विजयसिंह पंडित यांनी म्हटले आहे.