बीड : गेल्या अनेक वर्षांपासून जुना बाजार मधील लोहार गल्ली, भंडार गल्ली, हवेली समोर असलेली महेदवीया मस्जीद महेदवीया समाज च्या ताब्यात नसून शेजारी राहणाऱ्या नासेर याच्या वक्रदृष्टीमुळे खंडर होऊन पडली आहे. मस्जीदचे जीर्णोद्धार करून तिथे नमाज पठण करणे सुरू करायचे असल्याने या प्रश्नी मुक्त पत्रकार तथा एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष एस.एम.युसूफ़ यांनी शासन-प्रशासन दरबारी युद्ध पातळीवर पाठपुरावा सुरू केला आहे. मस्जीद प्रकरणात तहसीलदार यांनी लक्ष घालून तहसील कार्यालयात असलेली मस्जीद ची कागदपत्रे देण्याची कृपा करावी. अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार सुहास हजारे यांना दिले आहे. यावेळी त्यांच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, सय्यद फ़ूरखान आणि परेश मोरे यांची उपस्थिती होती.याविषयी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरातील जुना बाजार भागात असलेल्या लोहार गल्ली, भंडार गल्ली परिसरामध्ये प्रसिद्ध हवेली समोर मुस्लीम महेदवीया समाजाच्या मस्जीद ची जागा असून गेल्या अनेक वर्षांपूर्वी तिथे महेदवीया मस्जीद अस्तित्वात होती. परंतु मस्जीद शेजारी राहणाऱ्या नागरिकाने काही वर्षांपूर्वी मस्जीद बंद करून टाकली. यामुळे मस्जीदच्या भिंती पडल्या असून भिंतीचे अवशेष आजही आहेत. तरी मस्जीदच्या जागी प्रत्यक्ष पाहणी करुन महाराष्ट्र शासनाच्या गॅझेट मध्ये ७७ व्या क्रमांकावर नमूद असलेल्या मस्जीद च्या जागेचे तहसील कार्यालयाकडे असलेल्या कागदपत्रांच्या प्रती देण्याची कृपा करावी. जेणेकरून मस्जीद ची जागा ताब्यात घेऊन मस्जीदचे बांधकाम करण्यास अडचण येऊ नये. विनासायास मस्जीद चे जीर्णोद्धार पुर्ण व्हावे. तरी निवेदनाची दखल घेऊन महेदवीया मस्जीद च्या जिर्णोध्दारासाठी तहसील कार्यालयाकडे असलेल्या मस्जीद च्या कागदपत्रांच्या प्रती देण्याची कृपा करावी. अशी मागणी मुक्त पत्रकार तथा एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल चे बीड जिल्हाध्यक्ष एस.एम.युसूफ़ यांनी तहसीलदार सुहास हजारे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महेदवीया मस्जीदसाठी एस.एम.युसूफ़ यांची तहसीलदारांकडे धाव
RELATED ARTICLES