केज : दिनांक २१ जुलै गावाला जाणाऱ्या रस्ता चुकल्याने भरकटलेल्या एक सत्तर वर्षाची वृद्ध महिला केज तालुक्यातील माळेगाव येथील एका विहिरीत पडली.परंतु तिने धीर न सोडता विहिरीतील एका दोरीला पकडून मदतीसाठी आरडा-ओरडा केला परंतु रात्रीची वेळ आणी गावापासून वीहीर लांब असल्यामुळे त्या वृद्ध महिलेचा आवाज कुणालाच ऐकू जात नव्हता. तिचे नशीब बलवत्तर म्हणून काही वेळाने त्या विहिरी जवळून जात असलेल्या एकाने आवाज ऐकून विहिरीमध्ये पाहिले आणी इतर गावकऱ्यांच्या मदतीने त्या वृद्ध महिलेस विहिरी बाहेर काढून त्या वयोवृद्ध महिलेस जीवदान दिले.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दि.२० जुलै रोजी कांताबाई शिवराम लोणकर वय ७० वर्षे रा.जवळगाव ता. अंबाजोगाई येथील रहिवासी असून त्या बोरोटी येथील त्यांची मुलगी मनीषा ज्ञानदेव कुंभार तिच्याकडे गेल्या होत्या. परंतु वयोमानानुसार त्यांची स्मृती कमी झाल्यामुळे त्या त्यांच्या मूळ गावी आंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील जवळगाव येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या परंतु त्यांना काही न सुचल्यामुळे त्या भरकटून माळेगाव ता.केज येथील शिवारात फिरू लागल्या. रात्री ८:३० ते ९: ४५ वाजण्याच्या सुमारास अंधारात माळेगाव येथील अर्जुन दोडके यांच्या विहिरीत पडल्या परंतु कांताबाई यांनी स्वतःची जिद्द सोडली नाही. तशा अंधारातही चाचपडत त्यांनी विहिरीतील पाण्याच्या मोटरला बांधलेल्या रस्सीला पकडले आणी मदतीसाठी वाचवा वाचवा वाचवा म्हणत आरडाओरडा त्यांनी सुरू केला.परंतु त्या अंधारामध्ये त्यांचा आवाज कोणालाही ऐकू जात नव्हता.मात्र सुदैवाने त्यावेळी सदरील विहिरी जवळून जाणारे बाळू दोडके यांना त्या वृद्ध महिलेचा आवाज ऐकू आला.बाळू दोडके यांनी मोबाईलच्या प्रकाशाने पाहिले असता कांताबाई लोणकर दिसल्या.मात्र एकट्याला कांताबाई लोणकर यांना विहिरी बाहेर काढणे शक्य नव्हते. बाळू दोडके यांनी कांताबाई यांना बोलून धीर दिला.आणी गावात जाऊन मदतीला घेऊन येतो असे सांगून ते गावामध्ये गेले व अर्जुन गव्हाणे,कल्याण गव्हाणे आणी लक्ष्मण गव्हाणे यांना सोबत घेऊन ते सर्वजण विहिरीवर आले. आणी गावकऱ्यांनी विहिरीत उतरून त्यांनी दोरीचा आधार घेऊन कांताबाई यांना विहिरीतील पाण्याच्या बाहेर सुखरूप काढले. आणी कांताबाई यांना गावामध्ये आणून कोरडे कपडे,साडी देऊन प्रथमोपचार करून त्यांना उब दिली. मात्र या अपघातामुळे कांताबाई ह्या प्रचंड घाबरलेल्या होत्या.त्यामुळे त्यांना काही सूचेना झाले व त्याना स्वतःची ओळखही सांगता येत नव्हती.सामाजिक कार्यकर्ते कल्याण लोकरे यांनी पत्रकार गौतम बचुटे यांना ही माहिती दिली.त्यानंतर त्यांनी सदरील माहिती ही युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.संदीप दहिफळे यांना दिली. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केज,युसुफ वडगाव,बर्दापूर,नेकनूर, धारूर आणी बीड या पोलीस ठाणे हद्दीत माहिती देऊन कांताबाई लोणकर यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना माहिती देण्याची विनंती केली.त्यानंतर त्याची भीती थोडी कमी होऊन त्यातून त्या सावरल्या नंतर कांताबाई यांनी त्यांच्या नातेवाईकाची माहिती दिली. त्यानंतर जवळगाव व बोरोटी येथे संपर्क साधून त्यांना माहिती दिली. दिनांक २१ जुलै रोजी कांताबाई लोणकर यांचा मुलगा दिगंबर लोणकर,मनीषा कुंभार, जावई ज्ञानदेव कुंभार, नामदेव कुंभार,दत्तू कुंभार आणी विजय पाटणकर हे माळेगाव येथे आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामधन डोईफोडे,पोलीस नाईक बाळासाहेब घोरपडे यांनी कांताबाई लोणकर यांचा जीव वेळीच वाचविणाऱ्या बाळासाहेब दोडके,अर्जुन गव्हाणे, कल्याण गव्हाणे आणी लक्ष्मण गव्हाणे व गावकऱ्यांचे कौतुक केले. त्यानंतर कांताबाई लोणकर यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करून त्यांना त्यांच्या गावाकडे रवाना केले.
विहिरीत पडलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेचे गावकऱ्यांनी वाचविले प्राण
RELATED ARTICLES