HomeUncategorizedविवाहित तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहित तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

केज : सध्या जिवनातील नैराश्य, कमजोर आर्थिक परिस्थिती, कर्जबाजारीपणा अशा अनेक कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत असुन तशाच प्रकारची घटना राजेगांव येथे घडली असुन एका विवाहित तरूणाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या बाबत अधिक माहिती अशी की,केज तालुक्यातील राजेगांव येथिल सुग्रीव देवीदास जाधव या वय ३८ वर्षे या विवाहित तरुणाने दि.२१ जुलै रोजी स्वतःच्या राहत्या घरात दरवाज्याच्या पाठीमागील आतल्या बाजुने कडी लावण्याच्या रॉडला दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.कोणाचाही विश्वास बसणार नाही. अशी घटना या तरुणाने केली आहे. सदरील घटना ही दि. २१ गुरुवार रोजी सकाळी.८:०० ते ८:४५ वाजण्याच्या दरम्यान घरातील व्यक्तीने पाहिल्यानंतर उघडकीस आली. घरच्यांनी पाहिल्याने आरडाओरड सुरु झाल्याने क्षणार्धात ही वार्ता गावभर पसरली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तात्काळ नांदुरघाट पोलीस चौकीला कळवण्यात आल्याने चौकीला कार्यरत असणारे मेसे साहेब आणी भालेराव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी नांदूरघाट ग्रामीण रूग्णालयात नेउन शवविच्छेदन करण्यात आले.मयत सुग्रीव देवीदास जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले त्यामध्ये एक मुलगी १४ वर्षे,तर मुलगा १२ वर्षे असा परिवार असुन सुग्रीव जाधव यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments