HomeUncategorizedकोरेगाव येथील चिमुकल्यांना आता मिळणार अंगणवाडीची इमारत

कोरेगाव येथील चिमुकल्यांना आता मिळणार अंगणवाडीची इमारत

पंकजाताई मुंडेंच्या सूचनेनंतर बीडीओची कोरेगावला भेट , तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला.

केज : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्यातील नेतृत्व गुणाची पुन्हा एकदा दिसून आली. त्यांच्या एका फोनमुळे कोरेगाव ता.केज येथील बालकांना अंगणवाडीच्या इमारतीसाठी १ लक्ष ६७ हजाराचा निधी पंचायत समितीने तातडीने उपलब्ध करून दिला आहे.नवीन इमारत होईपर्यंत तात्पुरता निवारा प्रशासनाने चिमुकल्यांना उपलब्ध करून दिला. जेणेकरून चिमुकल्यांना उघड्यावर बसावे लागणार नाही.पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या कारवाईबद्दल गावातील नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील कोरेगाव येथील जागरूक नागरिक श्री उमाकांत तांदळे यांनी पंकजा मुंडे यांना १८ जुलै रोजी एक ट्विट करून उघड्यावर बसून शिक्षण घेणाऱ्या बालकांची व्यथा गावात लहान मुलांसाठी बालवाडी व अंगणवाडीची इमारत नसल्याने आमच्या गावातील लहान बालके हे उघड्यावर शिक्षण घेत आहेत. आपल्याकडून काही मदत झाली तर विद्यार्थ्यांची गैरसोय वाचेल असं त्यांनी ट्विट केलं होतं. पंकजा मुंडेंनी लगेच याची दखल घेत त्यांना लगेच रिप्लाय केला. मी पण मंजूर करून देते परंतु प्रक्रियेसाठी वेळ लागेल. तोपर्यंत एखादी शाळेकरीता खोली किंवा इतर व्यवस्था पहावी असे बीडिओना सांगते. तसेच दोन दिवसात बीडिओ कोरेगावला भेट देतील. असे सांगून केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांना फोन केला व याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली.गट विकास अधिकारी मोरया यांनी सकाळीच कोरेगाव येथे प्रत्यक्ष हजर राहून पाणी केली. व लोकल सेस फंडातून१ लक्ष ६७ हजार रुपये निधी उपलब्ध करून एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीला द्यायचे प्रशासकीय मान्यतेचे पत्रही सुपूर्द केले. या निधीतून लगेच अंगणवाडीच्या इमारत बांधकामाला सुरुवात होणार आहे. नवीन इमारत होईपर्यंत बालकांना उघड्यावर बसून शिक्षण घेता येऊ नये यासाठी तात्पुरता निवारा करून देण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांनी तातडीने दक्षिण घेत चिमुकल्याची सोय करून दिल्याबद्दल पालकांनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments