बीड : भारतीय टपाल खात्यातर्फे सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीनदयाळ स्पर्श योजना’ या नावाने फिलाटेली स्कॉलरशिप सुरु केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटे जमविणे आणि तिकिटांचे संशोधन करणे हा छंद निर्माण करण्याचा टपालखात्याचा मानस आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा छंद जोपासला आहे, अशा विद्यार्थ्यांची टपाल खात्यातर्फे ‘फिलाटेली प्रश्नमंजुषा आणि फिलाटेली प्रकल्प’ या आधारावर मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी पी ओ, मुंबई-४००००१ कार्यालयातर्फे निवड केली जाईल व विध्यार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. सदर स्कॉलरशिप मध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज सादर करण्यासाठी 01 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 हा कालावधी असेल. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉ. श्री बी. एच. नागरगोजे,डाक अधिक्षक, बीड विभाग बीड, यांच्या कडून करण्यात आले आहे. आधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२४४२-२२७०३५वर संपर्क साधावा.
टपाल खात्यातर्फे ‘फिलाटेली स्कॉलरशिप’
RELATED ARTICLES