HomeUncategorizedदुचाकीला अज्ञात स्कार्पिओची मागुन धडक ; दुचाकीस्वार जखमी

दुचाकीला अज्ञात स्कार्पिओची मागुन धडक ; दुचाकीस्वार जखमी

केज – कळंब रोडवर एका दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओ गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली.यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की, दि.१८ जुलै रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या दरम्यान बाळासाहेब उर्फ लिंबाजी पांडुरंग मेटे रा.राजेगाव हे कळंब-केज रस्त्याने केज कडे आपली दुचाकी क्रमांक एम एच १४ – जे एफ- ६४१५ वरून केजकडे येत होते.कळंब-केज रोडवरील संतोष पॅलेस हॉटेलजवळ एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार बाळासाहेब उर्फ लिंबाजी मेटे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गंभीर स्वरूपाचा मार लागला आहे.त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय,केज येथे उपचार करण्यात आले असून अज्ञात स्कार्पिओ गाडी ही अपघात स्थळावरून बेपत्ता झाली असून केज पोलीस पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments