HomeUncategorizedनगरसेवक नाजिम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी

नगरसेवक नाजिम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी

आष्टी / शाहनवाज पठाण : शहरातील तरुण युवक आ.बाळासाहेब आजबे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टी शहराध्यक्ष तथा नगरसेवक नाजिम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रेंडशीप फिटनेस क्लब येथे मोफत आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले यावेळी युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन तपासणी करून घेतलीआष्टी शहरात कोरोना काळात नगरसेवक नाजिम शेख यांना रुग्णांना फळे वाटप मेडीसीन उपलब्ध करून रुग्णांची देखभाल केली व‌ दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे फेटे न स्वीकारता सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.यंदाचा वाढदिवस सुद्धा त्यांनी वजन वाढलेले व्यक्ती बी पी,शुगर या रुग्णांची आष्टी शहरातील फ्रेंडशीप फिटनेस क्लब येथे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.यावेळी युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.थायराईड,बीपी,शुगर,मनक्याचे आजार,वजन कमी करणे वाढवणे या आरोग्य विषयक सल्लागार मोहसिन कुरेशी व अजिम शेख यांनी युवकांना देऊन व्यायामाचे महत्त्व पटवून दिले यावेळी मोठ्या प्रमाणावर शहरातील युवक व नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments