केज : तालुक्यातील साळेगाव येथे जवळबन येथील शिवाजी हंकारे त्याच्या मुलाने धारदार कोयत्यांनी वार करून मृतदेह लपून ठेवला होता. त्या खुनातील आरोपी मयताचा सख्खा मेव्हणा आणी खुनी मुख्य आरोपी याचा सख्खा मामा यालाही केज पोलिसांनी ताब्यात घेतले.दि.१४ जून रोजी दुपारी १:३०वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील जवळबन येथील पवन शिवाजी हंकारे वय२६ वर्ष याने त्याचे वडील शिवाजी केशव हंकारे वय ५५ वर्ष यास जवळबन येथून मोटरसायकलवर बसवून साळेगाव येथील गावाच्या दक्षिण दिशेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी पारखेचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या भागातील सदाशिव पारखे यांच्या गट नंबर २६५ मध्ये घेऊन गेला.त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले. त्यानंतर पवन शिवाजी हंकारे हा त्याचे वडील शिवाजी हंकारे म्हणाला की, तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता? असा जाब विचारला. दुपारी २:३० ते ३:००वाजण्याच्या सुमारास दोघामध्ये बाचाबाची झाली. पवन हंकारे यांनी दारूच्या नशेत असलेल्या वडील शिवाजी हंकारे यास अगोदर हाताने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने हातावर व पायावर सपासप वार शिवाजी हंकारे हा दारूच्या नशेत असल्यामुळे तो प्रतिकार करू शकला नाही.त्यानंतर पवन हंकारे यांनी त्याचे वडील शिवाजी हंकारे याच्या मानेवर आणी तोंडावर कोयत्याने सपासप ९ ते १० वार केले. त्यामुळे अतिरक्तस्रावाने शिवाजी हंकारे याचा जागीच मृत्यू झाला.त्या नंतर मारेकरी मुलगा पवन हंकारे याने त्याचे वडील शिवाजी हंकारे याचे प्रेत तेथे असलेल्या सोयाबीनच्या भुस्कटात कुणाला संशय येऊ नये म्हणून सोयाबीनच्या भुस्कटात लपवून ठेवले. त्यानंतर पवन हंकारे यांनी दि.१५ जून रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास स्वतः युसुफवडगाव पोलीस पोलीस ठाण्यात हजर होऊन स्वतःच्या वडिलांचा खून करून प्रेत केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळेगाव शिवरात लपवून ठेवले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांना दिली.या प्रकरणी मयत शिवाजी हंकारे यांचा मुलगा पवन शिवाजी हंकारे याच्या फिर्यादी वरून त्याच्याच विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं २४५/२०२२भा.द.वि३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या खुनात पवन हंकारे याचा मामा आशिष माणिक शिंदे रा.तांबवा ता केज याचा ही सहभाग असल्याचे आढळून आले.खुनाच्या घटने पासून आशिष शिंदे हा फरार होता तो वारंवार फोन नंबर बदली होता त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता.शेवटी पोलिसांनी त्याच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेतला. आणी दि.१६ जुलै रोजी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, अशोक नामदास आणि अनिल मुंदे यांच्या पथकाने आशिष शिंदे याला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील एका हॉटेल मधून मोठ्या सीताफीने ताब्यात घेतले.आशिष शिंदे याला न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दि.२२ जुलै पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास सय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे हे करीत आहेत.
त्या खून प्रकरणातील मामा पोलिसांच्या ताब्यात
RELATED ARTICLES