केज : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केज येथे प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा केजच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रयाग उत्तरप्रदेश येथील श्री .सुब्रतो बॕनर्जी यांची उपस्थीती होती .तर प्रमुख पाहुणेपदी पञकार तात्या गवळी,चंद्रकांत पाटील ,तसेच ब्रम्हाकुमारी सुज्ञानदिदी यांची उपस्थीती होती . प्रास्तविक ब्रम्हाकुमारी मधुदिदी यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सुब्रतो बॕनर्जी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गोविंद जाजु यांनी सत्कार केला .तसेच प्रमुख पाहुणे तात्या गवळी यांचा सत्कार शाल,श्रीफळ,व पुष्पगुच्छ देऊन बियाणी सेठ यांनी केला.चंद्रकांत पाटील यांचा सत्कार इंदाणीसेठ यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक ब्रम्हाकुमारी रेवतीदिदी यांनी केले.प्रमुखपाहुणे पदावरुन बोलताना ब्रम्हाकुमारी माता सुज्ञानदिदी यांनी सांगितले की,भारताचा ६५ टक्के भुभाग झाडांनी व्यापला होता.त्यावेळी भारत सुजलाम सुफलाम होता. लोकसंख्या वाढल्यामुळे वृक्षतोड करण्यात आली त्यामुळे प्रदुषण वाढल्यामुळे आजार वाढले.वृक्ष कार्बन डायऑक्साइड शोषुन घेतात व आॕक्सिजन देतात.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने किमान चार झाडे लाउन ती जगवली पाहीजेत.यामुळे जमीनीची धुप थांबून वसुंधरा बहरुन जाईल.यावेळी आलेल्या सर्व ब्रम्हाकुमारी व भाईजींना पर्यावरण व सामाजिक सलोखा राखण्यासाठी शपथ देण्यात आली.सर्व ब्रम्हाकुमारी परीवारातील साधकांनी वृक्ष लागवड करुन जतन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ब्रम्हाकुमारी मधुदिदी यांनी केले .ब्रम्हभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा केजच्या वतीने वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न
RELATED ARTICLES