HomeUncategorizedशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

बीड : शेतकऱ्यांना पिकविमा भराण्यासाठी ई पिकपहाणी पडताळणी गरजेची नसणार आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पहाणी आवश्यक आहे की नाही ? याबाबतीत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतु याबाबत राज्याच्या कृषी आयुक्तांनी प्रसिद्धीपत्तक काढून पीक विमा भरण्यासाठी ई-पीक पहाणी सक्तीची नसल्याचा खुलासा केला. यामुळे हा संभ्रम दूर झाला.परंतु १ ऑगस्ट २०२२ नंतर शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.शेती म्हटले की,संकटे आलीच कधी दुष्काळ तर कधी विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. शेतकऱ्यांचे हे नुकसान भरुन निघावे म्हणून देशात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.यावर्षीही २०२२-२३ पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै २०२२ ही शेवटची तारीख घोषित करण्यात आली आहे. सध्या अनेक शेतकरी आपल्या पिकांचा विमा उतरवून या योजनेत सहभाग घेत आहेत.पीक विमा करण्यापुर्वी ई-पीक पहाणी आवश्यक असल्याचे सांगितले जात होते. परंतु शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढताना केलेली पिकांची नोंद आणी प्रत्यक्षात पिकात तफावत दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरताना स्वयं घोषित पत्रकाद्वारे या योजनेत सहभागी होऊ शकतात. असा निर्णय शासनाने घेतला आहे.‌ ई-पीक पाहाणी नोंदणी १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी या तारखे नंतर आपल्या पिकांची ई-पीक पहाणी नोंद करुन घ्यावी असे आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे. या बातमी मुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असुन पिकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी लगबग करावी .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments