आष्टी शाहनवाज पठाण : तालुक्यातील मांडवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समिती व सदस्य यांच्या निवडी बिनविरोध झाल्या.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शितल संतोष मुटकुळे तर उपाध्यक्षपदी शरद परमेश्वर पवार तर सदस्यपदी सविता मुटकुळे, अजून मुटकुळे, प्रकाश श्रीखंडे,मिना करडूळे, साईनाथ शेळके,मंदा लगड, शोभा भोसले, शिल्पा भोसले, वैशाली कदम, रावसाहेब मुटकुळे, लक्ष्मण जाधव,यांची बिनविरोध निवड करण्यात आली हि निवड प्रक्रिया शनिवार दि.१६ जूलै रोजी शाळेत झालेल्या बैठकीत पार पडली.या बैठकीचे कामकाज मुख्याध्यापक जगन्नाथ सोनवणे यांनी पाहिले त्यांना सहकार्य शिक्षक शशिकांत खंडागळे, रवींद्र भणगे, महेश भालेराव, शशिकांत भोकरे, शहाजी तोतरे,सुदाम गायकवाड यांनी केले.आष्टी तालुक्यातील मांडवा जिल्हा परिषद प्राथमिक या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज अलौपिक आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळे यांने जगभरात नाव लौकीक केले तर काही विद्यार्थी राज्यातील विविध ठिकाणी पोलीस, महसूल, शिक्षण, डॉक्टर, बँक, उद्योजक व व्यवसाय या क्षेत्रात विविध ठिकाणी कार्यरत असून चांगल्या प्रकारे नावलौकिक देशाची समाजाची सेवा करत आहेत.जिल्हा परिषद शाळेचा नावलौकिक तालुक्यात व्हावा, यासाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या अध्यक्षाची व उपाध्यक्षांची नेमणूक झाल्यामुळे गावातील शिक्षणासाठी व उद्याचे सुजान नागरिक घडवण्यासाठी या नवनिर्वाचित अध्यक्षांचा नक्कीच विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना फायदा होईल, विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांना येणाऱ्या अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी अध्यक्ष नक्कीच पोहोचतील पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अविरत कार्य करेल असा विश्वास अध्यक्षा शितल मुटकुळे यांनी व्यक्त केला.यावेळी सरपंच अशोक मुटकुळे,हौसराव लगड, प्रशांत श्रीखंडे, अनिल मुटकुळे, योगेश मुटकुळे, सचिन मुटकुळे, धनेश मुटकुळे,अंगद पवार, योगेश कदम, परमेश्वर धुमाळ, बद्रीनाथ मुटकुळे, बापुराव मुटकुळे, विक्रम पवार,विजय मुटकुळे,हनुमंत श्रीखंडे आदी उपस्थित राहून निवडी नंतर यांनी स्वागत केले.
मांडवा येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ; शितल संतोष मुटकुळे
RELATED ARTICLES