बीड : मौजे हिवरसिंगा ता.शिरूर का.जि.बीड मधील शेतकरी यांच्या पीककर्जे नवे-जुने करण्यासाठी युनियन बँक शाखा छ.शिवाजी महाराज चौक बीड मधील शाखेतून टाळाटाळ करण्यात येत सध्याच्या तक्रारी श्री.शिवराम राऊत(ता.अ.शिवसंग्राम ओबीसी आघाडी) यांच्याकडे आल्यानंतर सर्व कर्जदार पीडीत शेतकऱ्यांना शिवसंग्राम कार्यालय हिवरसिंगा या ठिकाणी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष श्री.माऊली शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.त्या नुसार मौ.हिवरसिंगा मधील सर्व शेतकरी बांधवांनी युनियन बँक बीड शाळेतुन सन २०१६-१७ नंतर धनश्री शेतकरी मंडळ हिवरसिंगा यांच्या सहकार्याने सुक्ष्मसिंचन ठिंबकसंचसाठी सदरिल कर्ज घेतल्यानंतर.शेतकरी मंडळाच्या पाठपुराव्यामुळे या सर्वांचा कृषि विभाग मधून ५०%अनुदान देखील मिळाले.त्या नंतर उर्वरित कर्जाचे पीककर्ज करण्यात आले.सन २०१९ नंतर युनियन बँक शाखा- बीड यांनी नवेजूने करण्यात असमर्थता दर्शवली व ते पीककर्ज प्रलंबित झाले.यांच्या ७/१२ वर बोजा असल्याने व कर्जदार असल्याने यांना इतर समस्या हि वाढल्या त्यातच सन २०१९ मध्ये शासनाच्या म.जोतिराव कर्ज मुक्त योजनेतून मिळणारी प्रोत्साहन रक्कम ५० हजार रू मिळण्यासाठी हे अपात्र ठरत असल्याने शेतकरी बांधवात तिव्र असंतोष वाढत असल्याने श्री.माऊली शिंदे (ता.अ.शिवसंग्राम शिरूर) व श्री.शिवराम राऊत यांच्या सह सर्व पिडीत शेतकऱ्यांना श्री.सतिष बगल सर(शाखाधिकारी साहेब युनियन बँक) श्री.विशाल साबळे (कृषि अधिकारी युनियन बँक) यांच्याशी निवेदन व सविस्तरपणे चर्चा करूण पीककर्ज नवेजुने,बोजा असणारे सर्व शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन सर्व कागदपत्रे जमा करण्यात यावेत असे कळवले.या वेळी श्री.मुरलीधर सानप,श्री.श्रीमंत शिंदे,श्री.बंडु दुधाळ,श्री.रविद्र ग्रत,श्री.धर्मराज शिंदे,श्री.शिवाजी शिंदे,श्री.आरुण तिकांडे,श्री.प्रभाकर शिंदे,श्री.भास्कर शिंदे,श्री.पाडुरंग सालपे,श्री.भानुदास शिंदे,श्री.बबन शिंदे.सह सर्व पिडित शेतकऱ्यांची उपस्थित होते.या वेळी मौ.हिवरसिंगा मधील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून सहकार्य झाल्या बद्दल व अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी केलेले सहकार्य या मुळे शेतकरी यांनी श्री.शिवराम राऊत यांचे आभार व्यक्त केले.
अखेर शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी…
RELATED ARTICLES