केज : तालुक्यातील चिखलबीड, जीवाचीवाडी,लव्हुरी कानडीमाळी ते केज या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून,पुलाचे सुध्दा काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे तरी या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक यांनी सोमवारी निवेदनाद्वारे केज तहसीलदार यांना केली आहे.याविषयी सविस्तर वृत्त असे की,मौजे चिखलबीड,जीवाचीवाडी, लव्हुरी,कानडीमाळी ते केज या रस्त्यावरचे खड्डे बुजवणे व सदरील रस्त्यामध्ये आलेले पुलाचे काम सदरील गुत्तेदारास दि.२७/०१/२०२१ तांत्रिक मान्यता आदेश मिळालेले आहेत. त्यानुसार सदरील ठेकेदाराने वरील प्रमाणे गावाच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम केलेलेच नाही व पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे झालेले आहे व सदरील पुलाच्या कामात इस्टीमेट प्रमाणे न करता हलगर्जी पणाने झाले आहे. सदरील काम हे निकृष्ठ दर्जाचे झालेले असून सदरील काम करणा-या गुतेदाराच्या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे व या रस्त्यावरून ये जा करण्या-या लोकांना सदरील खड्डया मुळे खूप त्रास होत असून वाहनावरून जाताना तारेवरची कसरत करीत जावे लागत आहे तरी सदरील न केलेला रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम मागील एक वर्षापासून काम भेटलेले असताना सुद्धा काम का केले नाही ? याची विचारणा करून व कानडीमाळी येथील पुलाच्या कामात निकृष्ठ झालेल्या कामाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा खणखणीत इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक, राम भराडे, चंद्रकांत गिराम, गणेश वायबसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चिखलबीड,जीवाचीवाडी, लव्हुरी,कानडीमाळी ते केज या रस्त्यावर खड्डेच खड्डे
RELATED ARTICLES