आष्टी – अनेक वेळा ग्रामीण भागातील युवक रोजगाराच्या आशेने शहराकडे धाव घेतात पण तिकडे जाऊन सगळेच यशस्वी होतात असे नाही. रोजगारासाठी अनेक वेळा पायपीट करावी लागते.परिणामी कधी कधी चाकरी करण्याची वेळ येते त्यामुळे स्थानिक युवकांनी आपल्याच भागात स्वतःचे नवीन उद्योग सुरू करून आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून नव्या उमेदीने व्यवसाय केले तर नविन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. मनात फक्त मोठी जिद्द धरून युवकांनी आपल्याच भागात उपयोगी व्यवसाय उभारून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे असे प्रतिपादन आष्टी येथील आर. के. हाॅटेलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सैराट फेम सिने अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी केले.आष्टी येथील धोंडे पंपासमोरील अमित विश्वकर्मा यांच्या आर. के. नूतन हाॅटेलचे उद्घाटन सिने अभिनेते सैराट फेम कलावंत सुरेश विश्वकर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेडू,टकाटक चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे,कडा येथील उद्योजक काकासाहेब नलावडे,प्रा. संतोष बनसोडे, पत्रकार अविनाश कदम, पो. ह. रमेश गिरी,मोहसीन कुरेशी,विजय चव्हाण,प्रा. राम बनसोडे,कॅड राम मुटकुळे, बंजारा परषेदचे तालुकाध्यक्ष समीर जाठोत, विकास कदम,बाबा गायकवाड,जायभाय सर,विनोद भगत,विजय विश्वकर्मा,चेतन जाठोत, निखील विश्वकर्मा,महेश रसायली, अमोल रसायली,राम परदेशी,जितू ददेल, अशोक पिसाळ,लहूराज तांदळे, भाऊसाहेब शिंदे,आण्णासाहेब थोरवे,लालसिंग परदेशी,भरत रसायली,विर बहादुर परदेशी,मनोज परदेशी आदी उपस्थित होते.
स्थलांतरित बनून चाकरी करण्यापेक्षा उद्योजक बनून मालक व्हा – सिने अभिनेते सुरेश विश्वकर्मा
RELATED ARTICLES