केज : तालुक्यातील मौजे लव्हुरी येथे यावर्षी पाऊसमान चांगले आहे. शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे .जवळपास नव्वद टक्के पेरणी आटोपली आहे .शेतकर्यानी जे बियाने पेरले त्याची उगवण्याची वाट बघत आहे . मात्र लव्हरी येथील शेतकरी भारत बन्सी चाळक यांचे सर्वे नंबर १८५/१ मधील दोन एकर सोयाबीन ग्रिनगोल्ड कंपनीचे केडीएस – ७२६ हे सोयाबीन वान उगवलेच नसल्यामुळे सदरील शेतकरी चितांग्रस्त झाला आहे. पेरणी करीता कर्ज काढुन सोयाबीन वाणाची खरेदी केली मात्र सोयाबीन उगवले नसल्यामुळे शेतकर्यानी कृषी विभाग व गटविकास अधिकारी पंचायत समीती केज यांच्याकडे सदरील कंपनी विरूद्ध तक्रार दाखल केली आहे सदरील सोयाबीन लागवड क्षेत्राचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी एका निवेदनाव्दारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.केज तालुक्यातील शेकडो शेतकर्यांची बियाणे न उगवल्यामुळे आर्थीक नुकसानी सह फसवणुक झाली प्रकरणी बियाणे कंपनी व कृषी सेवा केद्र चालकावर गुन्हे दाखल करत शेतकऱ्याना शासकिय मदत मिळवुन देण्यासाठी कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून बि-बियाणे,खत,पेरणी, व मजुरी खर्च पाहता कृषी विभागाने तालुक्यातील शेतकऱ्याच्या नुकसान प्रकरणी शेतात जाऊन कृषी विभागाने संयुक्संस्था पंचनामा करावा व दोषी बोगस बि बियाने विक्री चालकासह कंपणीवर ४२० फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली आहे.
शेतकर्यांची फसवणुक ; सोयाबीनचे बियाने उगवलेच नाही
RELATED ARTICLES