केज : तालुक्यातील चिंचोली माळी येथील पांडुरंग नामदेव राऊत व त्यांच्या पत्नीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली असून त्यामध्ये पांडुरंग राऊत यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पांडुरंग राऊत वय ५५ व त्यांची पत्नी ह्या वरपगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला रस्त्यालगत राहत होते. दरम्यान दि.११ जुलै रोजी सायंकाळी ७:०० ते ७:३० वाजण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी काही अज्ञात तीन लोक आले व पांडुरंग राऊत यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढू लागले. त्यावेळी पांडुरंग राऊत यांनी विरोध केला असता सदरील ठिकाणची लाईट बंद करून अज्ञातांनी पांडुरंग राऊत यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या पत्नी शशिकला राऊत यांच्यावरही हल्ला केला त्यामध्ये काही गंभीर जखमी झाल्या आहेत.सदर घटना घडल्यानंतर जखमींना तात्काळ केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी पांडुरंग राऊत यांना मृत घोषित केले. तर शशिकला राऊत यांच्यावर उपचार चालू आहेत.दरम्यान सदर घटनेची खळबळ माजली असून घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग व पोलीस नाईक राजू गुंजाळ हे दाखल झाले असून परिसरात नाकाबंदी केल्याची माहिती देण्यात आली. सदरील हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप झाली नसून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
राऊत कुटुंबावर अज्ञातांचा खुनी हल्ला ; पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
RELATED ARTICLES