केज : तालुक्यातील नायगांव येथे येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा बीड जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.बजरंग सोनवणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी तालुक्यासह जिल्हाभरात साजरा करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून नायगांव ग्रामपंचायतच्या वतीने संधिवात,गुडघेदुखी, गुडग्यातील गादी सरकणे,नस फाटणे,खुबा ढळणे,संधिवात सांधा प्रत्यारोपण आदी आजार असणाऱ्या नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यासाठी औरंगाबाद येथील प्रसिद्ध ऑर्थो सर्जन डॉ.अभिषेक शिंदे यांनी आरोग्य सेवा दिली.रुग्णांना मोफत तपासणी बरोबरच मोफत औषधे देण्यात आली व ज्यांना अधिकचा त्रास आहे अशांना हॉस्पिटल चा सल्ला देऊन मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी दीडशे पेक्षा अधिक रुग्णानी या शिबिराचा लाभ घेतला.या तपासणी शिबिरासाठी मार्गदर्शक डॉक्टर म्हणून डॉ.बाहेती व डॉ.सोमवंशी यांनी सहकार्य केले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक तथा सरपंच विवेक खोडसे,माजी सरपंच लक्ष्मण खोडसे, माजी सरपंच रवींद्र खोडसे,शाहू महाराज खोडसे,सुधाकर खोडसे, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रसिध्दी प्रमुख सूरज खोडसे,चंद्रकांत गुजर, प्रवीण खोडसे यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल खोडसे,मनोज खोडसे, महेश खोडसे,नितीन खोडसे,हमीद शेख, पत्रकार दत्तात्रय मुजमुले व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
RELATED ARTICLES