डॉ रमेश खिळदकर,प्रा राजाराम सोनटक्के,प्रा गोपीनाथ बोडखे, पत्रकार जावेद पठाण पुरस्काराचे मानकरी
आष्टी : भिंगार येथील पद्मगंगा फाउंडेशनतर्फे दिल्या जाणार्या साहित्य पुरस्काराचे शनिवारी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. मुस्साअली बागवान यांच्या हस्ते दिमाखात वितरण करण्यात आले.लोकसाहित्याचे अभ्यासक गंगाधर मोरजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पद्मगंगा फाउंडेशनतर्फे दरवर्षी साहित्यातील उकृष्ट कलाकृतींना राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. शनिवारी हमाल पंचायतीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. मुस्साअली बागवान होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय खन्ना होते. कोविड काळामुळे गेली दोन वर्षे पुरस्कार वितरण कार्यक्रम घेता आला नाही. त्यामुळे काल 2020, 2021, 2022 अशा तीन वर्षांचे पुरस्कार वितरण एकाच वेळी करण्यात आले.डॉ. बागवान म्हणाले, स्व. गंगाधार मोरजे यांनी लोकसाहित्य विपुल संशोधन केले. त्यांनी निर्मिण केलेल्या वाटेवर अजूनही संशोधक चालत आहेत. नगर शहर स्थापना दिनाची सुरूवात स्व. गंगाधर मोरजे यांनी केली. यावेळी पुरस्कारार्थी अहमदनगर महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार, प्रा. डॉ. गोपीनाथ बोडखे, हभप मारोती चोंडीकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रा. मच्छिंद्र मांलुजकर, प्रा. येळवंडे, प्रा. प्रकाश सूर्यवंशी, हमाल पंचायतीचे कार्ले, पत्रकार अविनाश कदम, डॉ. निर्मला पालेकर-ऐतलवाड, कल्याणी बरसमवाड आदींसह साहित्यप्रेमी उपस्थित होते. प्रास्ताविक पद्मगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष माजी प्राचार्य धोंडीराम वाडकर यांनी केले. तर, सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल बरसमाड यांनी तर, डॉ. ज्ञानेश ऐतवाल यांनी आभार मानले.चौकट पुरस्काराचे मानकरी ः-लोकसाहित्य – प्रा. डॉ. राजाराम सोनटक्के, संशोधन – प्रा. डॉ. रमेश खिळदकर, पत्रकारिता – जावेद गफुरखान पठाण, 2021 ः समिक्षा – प्रा. डॉ. सुधाकर शेलार, कादंबरी – पत्रकार अशोक निंबाळकर, सामाजिक – लक्ष्मण ऐतवालड, 2022 ः काव्य – डॉ. ज्योती रहाळकर, गझल काव्य – प्रसाद कुलकर्णी, संतकाव्य – हभप मारोती चोंडीकर, शैक्षणिक – प्रा. डॉ. गोपीनाथ बोडखे.