बीड : शहरातील प्रभाग क्र.12 व 13 हा भाग नगर परिषदेच्या सत्ताधार्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला आहे. या भागामध्ये मध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची आ.संदीप क्षीरसागर यांनी शनिवारी दि.9 जुलै रोजी कामांच्या ठिकाणी प्रत्यक्षात जावून पाहणी केली. शहरातील प्रभाग क्र.12 व 13 राधानगरी हा भाग जाणीवपुर्वक नगर पालिकेच्या मागील सत्ताधार्यांकडून दुर्लक्षीत केला जात होता. या भागांमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांनी आपल्या आमदार फंडातून व शासनाच्या इतर लेखा शिर्षातून विविध कामे केली आहेत. काही कामे सध्या सुरू आहेत. या कामांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी त्या ठिकाणी जावून नागरिकांसमवेत पाहणी केली.सर्व कामे दर्जेदार आणि परिपुर्ण होत असल्याने आ.संदीप क्षीरसागर यांचे नागरिकांकडून आभार मानले जात आहेत.
