HomeUncategorizedहाॕटेल मजुराला अज्ञात वाहनाने दिली धडक

हाॕटेल मजुराला अज्ञात वाहनाने दिली धडक

केज : शहरातील छञपती संभाजी महाराष्ट्रात चौकाजवळ पायी घरी निघालेल्या हॉटेल कामगारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सदरची घटना शुक्रवारी रात्री ९:३० दरम्यान घडली.शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणारे मधुकर दादाराव डिसले रा.बाराभाई गल्ली केज हे घरी निघाले होते. परंतु त्यांना मंगळवार पेठ चौकाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच १०८ चे पायलट मकरंद घुले व डॉ.ऋतुजा मोटे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.परंतु जखमीची तब्येत गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments