केज : शहरांमध्ये सर्व वार्डात सध्या स्वच्छता मोहीम चालू आहे.परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे साथीच्या रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी आपल्या घरासमोरील नाली व परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे.त्या करिता आपण आपल्या घरातील टाकाऊ केरकचरा, प्लास्टिक, कॅरी बॅग, रिकाम्या दुधाच्या पिशव्या व आपल्या घरातील शिळे खराब झालेले अन्न अशा वस्तू नालीत किंवा रिकाम्या जागेवर न टाकता ते सकाळी कचरा गाडीमध्ये टाकाव्यात जर आपण कचरा घरातील टाकाऊ वस्तु,शिळे खरकटे अन्न सार्वजनिक ठिकाणी टाकले तर पाऊस आल्यानंतर त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरते आपल्याला व आपल्या परिवारातील लहान मुलांना व मोठ्या माणसांना देखील साथीच्या रोगाचा आजार होण्याचा संभव असतो. तसेच शहरांमध्ये सर्व वार्डात व सार्वजनिक ठिकाणी कचराकुंडया थोड्या दिवसात नगरपंचायत ठेवणार आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांना उघड्यावर शौचाला बसवु नये.त्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. शौचावरील जंतू, माशा यापासून देखील साथीचे रोग आजार होतात. याकरिता आपल्या घरातील लहान मुलांना सार्वजनिक ठिकाणी शौचास बसवु नये.तसेच नाल्या पावसाच्या पाण्याने व कचऱ्यांनी भरलेल्या दिसुन आल्यास तात्काळ नगरपंचायतला संपर्क करावा व शहरातील,वार्डामधील पथदिवे,लाईट पावसामुळे बंद पडले असतील तर लवकरात लवकर नगरपंचायतला संपर्क करावा म्हणजे त्या त्या भागातील स्वच्छता व लाईट सुरु चालू राहील.तरी केजच्या सर्व सुजान नागरिकांना आवाहन करण्यात येते की,आपण सर्वांनी नगर पंचायतच्या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे व आपले केज सुंदर केज हे स्वच्छ ठेवावे असे आवाहन केजच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई प्रदीप बनसोड यांनी केले आहे.
केजच्या नागरिकांनी नगरपंचायतच्या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे ; नगराध्यक्ष सौ.सिताताई बनसोड
RELATED ARTICLES