केज : नशेच्या अंमलाखाली गावात दहशत माजवून एकावर चाकूने हल्ला करून जखमी केले आणि तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवून गावात प्रचंड दहशत माजविणाऱ्या एका माथेफिरू तरुणाला केज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर एकजण पळून गेला आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की,दिनांक ७ जुलै रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास कळंब आगराच्या एसटीने सुरेश रोकडे हे बोरगाव कडे येत होते.त्याच एसटीत नितीन उर्फ बाल्या दत्ताञय गव्हाणे आणि मनोज बबन गव्हाणे हे उतरत असताना त्यांनी सुरेश रोकडे मारहाण केली आणि मनोज गव्हाणे यांनी हातातील चाकू सुरेश रोकडे यांच्या डोक्यात मारून दुखापत केली व सार्वजनिक ठिकाणी सुरेश रोकडे यास शिवीगाळ करीत हातात तीक्ष्ण धारदार चाकू घेऊन दहशत माजवली ते दोघेही माथेफिरू तरुण अंमली पदार्थाच्या अंमलाखाली नशेमध्ये होते. त्यामुळे गावात दहशत निर्माण झाली होती.दरम्यान या घटनेची माहिती केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना समजताच त्यांनी पोलीस निरीक्षक वैभव सारंग यांच्यासोबत पोलीस नाईक राजू गुंजाळ,चंद्रकांत काळकुटे आणि हनुमंत गायकवाड यांना सरकारी वाहनाने घटनास्थळी रवाना केले. पोलीस पथक घटनास्थळी दाखल होताच पोलिसांना पाहून मनोज गव्हाणे व नितीन गव्हाणे हे हल्लेखोर पळून जाण्याच्या प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतले. तीक्ष्ण हत्याराने मारहाण करीत गंभीर दुखापत करून गावात दहशत माजविणारा गावगुंड मनोज गव्हाणे यास ताब्यात घेतले. मात्र त्यावेळी त्याचा साथीदार नितीन गव्हाणे हा पळून गेला.चाकू हल्ल्यात जखमी झालेले सुरेश रोकडे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात मनोज गव्हाणे व नितीन गव्हाणे या दोघांविरुद्ध गु.र.न.२८२/२०२२भा.द.वि.३२४,३२३,५०४,५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.
धारदार हत्याराचा धाक दाखवून गावात दहशत माजविणारा पोलिसाच्या ताब्यात
RELATED ARTICLES