केज : तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ, केज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२-०७-२०२२रोजी दुपारी ०२-३० वाजता दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर केज येथे मध्यस्थी जनजागृती याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती. एस.व्ही.पावसकर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,केज या होत्या.तसेच श्री.एन.डी.गोळे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर,केज तसेच श्री.पी.व्ही.पाटील सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर केज,श्रीमती ए.टी.जगताप,सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर, केज व वकील संघाचे अध्यक्ष श्री.अॕड एम.एस.लाड,वकील संघातील सदस्य अॕड.डी. टी. सपाटे,अॕड.एस.एन. मुंडे,अॕड.एस.व्ही.मिसळे अॕड.ए.आर.मुंडे,अॕड.एस. बी.मस्के,अॕड.एस.एन.मुंडे व जेष्ठ विधीज्ञ व पक्षकार उपस्थित होते.तसेच सदर शिबीरामध्ये वकील संघाचे अध्यक्ष अॕड.श्री.एम.एस.लाड यांनी उपस्थित सर्वांना मध्यस्थी वाद मिटवण्याचे कायदे समजावुन सांगीतले व सविस्तर मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणामध्ये न्यायाधीश श्रीमती एस.व्ही पावस्कर यांनी मध्यस्थी मार्फत न्यायालयीन प्रकरणात समेट घडवून आणण्याचे व दोन्ही पक्षकारांना त्यांचे मनाप्रमाणे निकाल मिळवून घेण्याच्या असणाऱ्या पर्यायाबद्दल व इतर फायद्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष अॕड.श्री.एम.एस.लाड यांनी केले.तसेच सुत्रसंचालन अॕड. एस.एन.मुंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन अँड.एस.व्ही.मिसळे यांनी केले.या शिबीरास बहुसंख्येने ३५ लाभार्थी यांची उपस्थीती होती.
केज दिवाणी व फौजदारी न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम संपन्न
RELATED ARTICLES