HomeUncategorizedस्वारातीच्या डेंटल विभागातील तांत्रिक अडचणी दूर

स्वारातीच्या डेंटल विभागातील तांत्रिक अडचणी दूर

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालयाच्या डेंटल विभागात ओ.पी.डी दरम्यान आर.सी.टी (रूट कॅनल), व्हाईट सिमेंट, कवळी बसविणे (इंडियन व इंपोर्टेड), सिमेंट भरणे व चांदी भरणे, एक्स-रे करणे इत्यादी सुविधा देणे बाबत सामाजिक कार्यकर्ते अहेमद पप्पुवाले यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत निवेदन दिले होते. या मागण्यांबाबत स्वाराती रूग्णालय प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत स्वारातीच्या डेंटल विभागातील तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. मागील आठ दिवसांपासून विविध सुविधांचा लाभ गरजू रूग्णांना मिळू लागला आहे.सामाजिक कार्यकर्ते अहेमद पप्पुवाले यांनी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय ग्रामीण रूग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना २२ मार्च २०२२ रोजी निवेदन दिले होते. या निवेदनाची प्रत केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांना ही दिली होती, सदरील निवेदनात पप्पूवाले यांनी स्वा.रा.ती.ग्रा.वै.म. हे आशिया खंडातील सर्वात मोठे व जुने रूग्णालय असून तालुक्या बाहेरील खेडेगावातील सामान्य जनतेची आपल्या वैद्यकीय रूग्णालयावरच उपचारासाठी भिस्त असते. म्हणून सदरील विषय त्वरीत निकाली काढण्यात यावा. हा विषय मागील ५ वर्षांपासून प्रलंबीत आहे. कारण, रूग्णालयात उपचारासाठी आवश्यक सर्व प्रकारची तांत्रिक अडचण दूर करून डेंटल विभागात ओ.पी.डी दरम्यान आर.सी.टी (रूट कॅनल), व्हाईट सिमेंट, कवळी बसविणे (इंडियन व इंपोर्टेड), सिमेंट भरणे व चांदी भरणे, एक्सरे करणे इत्यादी सुविधा देवून सर्व जनतेस उपकृत करावे अशी विनंती करण्यात आली होती. डेंटल विभागातील डॉक्टरांना रूग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये न पाठविण्याची सूचना आपल्याकडून देण्यात यावी. कारण, प्रायव्हेट हॉस्पीटल मध्ये रूग्णांची आर्थिक लूट होते. आपण सूचना दिल्यास ती लूट थांबेल अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली होती. गोरगरीब व गरजू रूग्णांना योग्य औषधोपचार मिळावेत या भूमिकेतून आणि निवेदनातील सदरच्या मागण्यांबाबत स्वाराती रूग्णालय प्रशासनाने वेळीच सकारात्मक प्रतिसाद देत स्वारातीच्या डेंटल विभागातील तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. मागील आठ दिवसांपासून विविध सुविधांचा लाभ गरजू रूग्णांना होत आहे. निवेदनाची दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पप्पुवाले यांनी आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा, स्वा.रा.ती.शा.वै.ग्रा.रू व महाविद्यालयाचे सन्माननिय अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, सहयोगी अध्यापक डॉ.सिद्धेश्वर फड आणि डेंटल विभागातील सर्व सन्माननिय डाॅक्टर, कर्मचारीवृंद यांचे आभार मानले आहेत. भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अहेमद पप्पुवाले यांनी मिञ परिवाराच्या पाठबळावर सातत्यपूर्ण समाजकार्य करून सामाजिक बांधिलकीचा सेतू उभारला आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ.नमिताताई मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वात आणि ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनानूसार स्वाराती रूग्णालय, तहसिल कार्यालय, नगरपरिषद, वीज वितरण कंपनी यासह ज्या-ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. तिथे उपलब्ध होत जनतेच्या विविध समस्या सोडविण्याचे काम पप्पुवाले हे अविरतपणे करीत आहेत. वृद्ध, दिव्यांग व कष्टकरी बांधवांचा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून छत्र्यांचे वाटप तसेच कोविड काळात गरजूंना अन्नधान्याचे कीट वाटप करून अंबाजोगाई शहराच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात अल्पावधीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील असून देखील समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी तरूण कार्यकर्त्यांपुढे आदर्श उभा केला आहे. भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून अहेमद पप्पुवाले यांची शहरात ओळख आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना देखील अंबाजोगाई व परिसरातील युवकांना एकत्र करून पप्पुवाले यांनी युवक नेतृत्व अक्षय मुंदडा यांचे हात बळकट करून भारतीय जनता पक्षाने केलेली विविध लोकहिताची कामे समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याचे काम अहेमद पप्पुवाले हे सातत्याने करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments