HomeUncategorizedमाजी आमदार संगीताताई ठोंबरे राजकारणात पुन्हा सक्रिय!

माजी आमदार संगीताताई ठोंबरे राजकारणात पुन्हा सक्रिय!

केज : विधानसभाच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार संगीताताई विजयप्रकाश ठोंबरे पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. राजकीय घडामोडी मध्ये बदल होताच केजच्या माजी आमदार ठोंबरे यांनी पुन्हा राजकारणात एन्ट्री केली आहे. भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.बीडच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा माजी आमदार संगीता ठोंबरे यांना विसर पडलेला दिसत आहे. बीडच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना डावलून माजी आमदार संगीता ठोंबरे देवेंद्र फडवणीस यांच्या गटात सामील झाल्याचे दिसुन येत आहे.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व पंकजाताई मुंडे यांच्या जवळच्या अत्यंत विश्वासू माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांची केज विधानसभा मतदारसंघात परीचीत आहेत. संगीताताई ठोंबरे यांनी गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी प्रकरणात मोठमोठे माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सूतगिरणी संदर्भात चर्चा केलेली दिसत आहे.भेटी मागच्या चर्चा मागे केज विधानसभेला वेगळेच वळण आलेले दिसत आहे. सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा फोटो सध्या चर्चेत दिसत आहे.माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांची भूमिका स्पष्ट करणार काय? पुन्हा राजकारणात एन्ट्री केज मध्ये पुन्हा भाजपचा दुसरा गट तयार झाल्याचे दिसत आहे. सूतगिरणी संदर्भात बनावट स्वाक्षऱ्या करुन लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगीरणीच्या संचालक पदावर आपली नेमणूक केल्याच्या कथीत संचालक गणपती कांबळे यांच्या फिर्यादीवरुन माजी आमदार संगीताताई ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणुकीसह इतर गुन्हे नोंद करुन चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश केजच्या न्यायालयाने दिले होते.त्यामध्ये अजून कोर्टामध्ये दावा चालू आहे.भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सूतगिरणी संदर्भात चर्चा झालेली दिसत आहे. व या मागचे रहस्य नागरिकांना असं दिसत आहे की सूतगिरणी वाचवण्याचा प्रयत्न माजी आमदार संगीता ठोंबरे यांचा दिसत आहे.तसेच माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांनी देवेंद्र गट केज मध्ये राजकारणात सक्रिय केल्याचं दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची मुंबई येथील सागर या शासकीय निवासस्थानी माजी आमदार संगीता ठोंबरें,हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने, गोपीनाथराव मुंडे सूतगिरणीचे चेअरमन डाॕ.विजयप्रकाश ठोंबरे यांनी आज सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी हे सर्वजण उपस्थित होते. माजी आमदार संगीताताई ठोंबरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो चर्चेत आहे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments