बीड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि परिसर विकास करण्यसाठी गेले अनेक वर्षापासुन बीड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसंग्रामचे शहराध्यक्ष ॲड. राहुल मस्के यांनी अनेक वेळा शासन प्रशासनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसर विकासाची वेळोवेळी मागणी केली होती तसेच आंदोलने केली होती सन 2014 साली तत्कालीन जिल्हाधिकारी श्री सुनिल केंद्रेकर साहेबांनी तत्कालीन नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. व्यंकटेश निलावाड यांना तात्काळ 4 कोटी रूपयांचे पुतळा व परिसर विकासाचे नाविण्यपूर्ण योजने अंतर्गत अंदाजपत्रके बनवण्याचे आदेश दिले व त्या प्रमाणे लातुरच्या एजन्सींने आराखडा बनविला व अंदाजपत्रके बनविले व त्यात पुतळा परिसराच्या बाजार तळाच्या सभोवताली 128 व्यवसायीक गाळे तसेच नदिच्या कडेला तटरक्षक भिंत हायमास्क दिवे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, अदयावत स्वच्छतागृह कार्यक्रमासाठी स्टेज् सर्व परिसरात पेव्हरब्लॉक, झाडे अशा एक ना अनेक सुविधा असलेले अंदाजपत्रक बनविण्याचे आदेश श्री सुनिल केंद्रकर साहेबांनी दिले होते व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी साठी ठेवण्याचे सांगितले परंतु त्या पूर्वीच मा. जिल्हाधिकारी केंद्रेकर साहेब यांची बदली झाल्यामुळे श्री. राम साहेब जिल्हाधिकारी म्हणुन रुजू झाले त्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली या बैठकीस तत्कालीन पालकमंत्री जयदत्त् क्षीरसागर, आ. विनायक मेटे, आ. धनंजय मुंडे, आदिंसह अनेक आमदार व सदस्य् बैठकीस उपस्थित होते. अनेक वेळा मागणी करूनदेखील जाणिवपूर्वक जातीय व्देषाने तत्कालीन पालकमंत्री जयदत्त् क्षीरसागर यांनी या विकास आराखडयाला मंजुरी न दिल्या मुळे ॲड. राहुल मस्के यांनी 4 कोटी रूपयांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विकासाला मंजुरी देण्यात यावी म्हणुन शासन व जिल्हा प्रशासनाच्या विरोधातच बैठकीच्या दिवशीच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात टॉवरवर चढुन प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी या साठी अत्म्हत्येचा प्रयत्न् केला होता. हे आंदेालन त्यावेळी लक्षवेधी झाले होते. या वेळी अत्महत्या करण्याचा प्रयत्न् केल्यामुळे ॲड. राहुल मस्के यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. गेल्या 9 वर्षापासुन मा. जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी चालु होती. पुराव्या अभावी ॲड. राहुल मस्के यांची जिल्हा व सत्र न्यायालयांने निर्दोष मुक्तता केली. या न्यायालयीन प्रकरणात प्रसिध्द विधीज्ञ ॲड. अविनाश गंडले, ॲड. इम्रान, ॲड. बप्पा माने ॲड. सरवदे, ॲड. राजेश बनसोडे आदिंनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
ॲड. राहुल मस्के यांची आत्महत्याचा प्रयत्न् केल्याच्या आरोपातुन निर्दोष मुक्तता – ॲड.अविनाश गंडले
RELATED ARTICLES