HomeUncategorizedमौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा ; सय्यद मिनहाज

मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा ; सय्यद मिनहाज

बीड : महाराष्ट्र शासनाचे, अल्पसंख्याक विकास विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत असलेल्या मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई मार्फत महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक ( मुस्लिम,बौद्ध, जैन, सिख,खिश्चन,पारसी व ज्यू ) या समुदायातील गरजु विद्यार्थींकरिता व्यवसायिक, तांत्रिक,मेडिकल या सारख्या उच्च अभ्यासक्रमाकरीता (उदा ITI, D.ED, B.ED, MBA, MCA, BSC Agriculture/IT/Nursing, ENGGINEERING, PHARMACY, M.B.B.S, MDS, BDS, BHMS, BUMS, BAMS (Medical, Technical, Managment all Faculties) All Vocational Courses.) online शैक्षणिक कर्ज योजनेचे अर्ज सन 2022-23 या वर्षासाठी स्विकारली जात आहे. या योजनेचा जास्तीत जास्त अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थींना फायदा व्हावा यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून संबंधित जिल्हा कार्यालयात सय्यद इम्रान काद्रीजिल्हा व्यवस्थापक,मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या, बीड/जालना जिल्हा कार्यालय पता रब्बानी मंजिल 2रा मजला रहेमत नगर एस. पी ऑफिस समोर बार्शी रोड बीड.येथे संपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव जमा करा आणि त्वरित शैक्षणिक कर्ज द.सा.द.शे. 3% ह्या कमी व्याज दरात मिळवा.अधिक माहिती करीता तसेच online अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in किंवा https://malms.maharashtra.gov.in संकेतस्थळावर संपर्क करावा.असे मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दिन यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments