HomeUncategorizedपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भाडेकरू तरुणाची मोटर सायकल जाळली

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भाडेकरू तरुणाची मोटर सायकल जाळली

केज : शहरातील महात्मा फुले नगर भागातील स्वतःच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या गुत्तेदार भाडेकरूची पल्सर कंपनीची मोटरसायकल जाळल्याची घटना घडली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बळीराम उत्तम घुले वय २८ वर्षे राहणार गावंदरा ता.धारूर ह.मु. महात्मा फुले नगर केज येथे तो एकटाच फुलेनगर येथील बबनराव भानुदास ढाकणे यांच्या घरामध्ये गेले चार महिन्यापासून भाड्याने रूम करून राहतो. बळीराम घुले हा केज येथे गुत्तेदारीचे काम करतो. त्याची आई गावंदरा ता. धारूर राहते.बळीराम घुले यांचे वडील हे गेले तीन वर्षांपूर्वी मयत झाले असून दोन भाऊ आयुष्यभर गावीच राहतात.बळीराम घुले याच्या रूम समोर बबनराव ढाकणे चा मुलगा दीपक ढाकणे याची रूम आहे.
दिनांक ०१ जुलै रोजी सकाळी बळीराम घुले हा कामावर लवकर जायचे असल्याने दीपक ढाकणे याच्या पत्नीचे मोबाईलचे चार्जर हे बळीराम घुले कडे होते. ते मोबाईलचे चार्जर देण्यासाठी बळीराम घुले हा ६:०० वाजण्याच्या सुमारास दीपक ढाकणेच्या रूम समोर जाऊन चार्जर दिले. त्यावेळी त्या दोघांच्या बोलण्याचा आवाज ऐकून बबन ढाकणे व त्यांची पत्नी तू आमच्या खोलीत मध्ये कशाला गेलास असा संशय घेऊन बळीराम घुले याच्यावर पोलीस स्टेशन केज येथे गुन्हा दाखल केला आहे.
त्याचा राग मनात धरून दिनांक ०२ जुलै रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास भाऊ वैजनाथ उत्तम घुले व शामसुंदर शिवाजी सांगळे हे दोघेजण रूम मधील सामान व गाडी आणण्यासाठी गेले असता.बबन भानुदास ढाकणे, दीपक बबन ढाकणे व राधाबाई बबन ढाकणे या तिघांनी मिळून पल्सर कंपनीची मोटर सायकल एम एच ४४ वाय ६१५७ या गाडीवर व घरगुती काही सामानावर पेट्रोल टाकून जाळीत असताना दिसले. त्यावेळी मला माझ्या भावाने मोबाईल वरून फोन करून घडलेला प्रकार सांगितला मी लागलीच त्या ठिकाणी आलो असता मला त्यांनी शिवीगाळ करून तुला कोण मदत करेल त्यांना व तुला जिवंत ठेवणार नाही म्हणून धमकी दिली आहे. बळीराम घुले यांनी पल्सर कंपनीची मोटर सायकल माऊली बजाज शोरूम वडवणी येथून घेतली असून तिची किंमत एक लाख अठ्ठावीस हजार रुपये असून तिचे हप्ते भरणे चालू आहे. बळीराम उत्तम घुले यांच्या फिरेदी वरून बबन भानुदास ढाकणे, दीपक बबन ढाकणे व राधाबाई बबन ढाकणे या तिघांविरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments