HomeUncategorizedबांबू शेती पर्यावरणासह उत्पन्नासाठी चांगली ; शेतकऱ्यांनी बांबु लागवड करावी -...

बांबू शेती पर्यावरणासह उत्पन्नासाठी चांगली ; शेतकऱ्यांनी बांबु लागवड करावी – पाशा पटेल

सध्या सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला महत्त्व आले असून पर्यावरणासाठी व उत्पन्नासाठी खूप चांगला पर्याय म्हणून बांबूची शेती कडे पाहिले जात असून शेतकऱ्यांना याचा विचार नक्की करावा असे मा.आ.पाशा पटेल यांनी म्हटले आहे.शेतकऱ्यांना शेती विषयक विविध माहिती मिळत राहिल्यास उत्कृष्ट शेती करून चांगले उत्पन्न मिळण्यासाठी कष्टा बरोबर विविध तंत्रज्ञान माहिती असणे आवश्यक आहे.सध्या सर्व जग हे पुन्हा सेंद्रिय उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरात चे राज्यपाल श्री.आचार्य देववृत्तजी यांचे प्राकृतिक सेंद्रिय शेती याविषयीचे भाषणाची चित्रफित दिनांक २९ जुन रोजी रात्री ८-०० वाजता दाखविली त्यानंतर पारंपारिक भजनाचा कार्यक्रम झाला व दि ३० जुन रोजी  विभागीय कृषी संचालक श्री दिनकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बांबू लागवड व पर्यावरण याविषयावर कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष मा. आ. पाशा पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.सेंद्रिय शेती संधी व समस्या याविषयावर भारतीय किसान मंच चे प्रदेश अध्यक्ष श्री बळीराम सोळंके यांचे मार्गदर्शन लाभले प्रमुख अतिथी म्हणून डॉ.वसंतराव देशमुख कृषी विज्ञान केंद्र डिघोळअंबाचे प्रमुख शास्त्रज्ञ व प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे प्राचार्य शासकीय कृषी विद्यालय अंबाजोगाई होते  उपविभागीय कृषि अधिकारी सुर्यकांत वडखेलकर,कृष्णा कर्डिले, मदने कृषी मंडळ अधिकारी , सिता बनसोड ,भारतीय किसान संघाचे यादव सर , नलावडे आबासाहेब ,कै. भानुदासराव करपे यांच्या समाधी स्थळाजवळ चंदन सावरगाव जवळबन रोड लगत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी बोलताना मा.आ. पाशा पटेल म्हणाले की, आज संपूर्ण जग नैसर्गिक शेती व सेंद्रिय उत्पादनाकडे आशेने पहात आहे , तसेच चांगल्या उत्पन्नाच्या साठी बांबु शेती हि खूप फायदेशीर ठरत आहे बांबु पासून विविध वस्तू बनवल्या जातात ज्याला बाजारात चांगला भाव पण मिळतो .बांबु शेती कडे अनेकांनी आपला कल वळवला आहे असे सांगून शेतकऱ्यांनी बांबू शेती करण्यासाठी प्रयत्न करावा मी आपल्या सोबत आहे असे सांगितले . यावेळी  गावकरी तसेच परिसरातील व शेतीची आवड असणारे  सर्व  या मेळाव्यास उपस्थित होते  प्रास्तविक दिलीप करपे , सुत्रसंचलन सुधीर रानमारे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments