केज : चारित्र्यावर संशय घेत आणि माहेरहुन पैसे घेऊन ये म्हणून केज येथे विवाहितेस तिच्या नवऱ्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न विवाहितेच्या फिर्यादीवरून नवरा, सासू-सासरा आणि इतर दोन नातेवाईक अशा पाच जणांविरुद्ध दाखल केला असून नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील लखनौ येथील अंकिता हिचा केज तालुक्यातील जोला हे.मु. महात्मा फुले नगर केज येथील दीपक बबनराव ढाकणे याच्या सोबत सहा वर्षा पूर्वी सन२०१६ मध्ये प्रेम विवाह झालेला आहे. त्यांना दीड वर्ष वयाची मुलगी आहे.दरम्यान दीपक हा सैन्य दलात नोकरीस होता. लग्न झाल्यानंतर दिपक याने नोकरीवरून घरी राहिला. तो पुन्हा नोकरीला गेला नाही.लग्न झाल्यानंतर अंकिता व दीपक हे दोघे लखनौ येथे राजाजी पुरम येथे भाड्याच्या घरामध्ये एकत्र राहिले. त्यानंतर सन २०१८ मध्ये ते केज येथील फुलेनगर येथे राहण्यास आले. लग्नापासून दीपक हा काही कामधंदा करीत नव्हता.लग्न झाल्यापासून थोड्या थोड्या कारणावरून त्यांच्या भांडण होत असत.दीपक हा काही काम धंदा करीत नसल्याने तो त्याची पत्नी अंकिता हिला तिच्या माहेराहून पैसे आणावयास सांगत असे.ती आई वडील यांच्याकडे माहेरी लखनौ येथे अधून मधून जाऊन ब्युटी पार्लरचे काम करून आणि आई-वडिलांकडून मिळतील तेवढे पैसे आणून पुन्हा दीपककडे येत असे. दीपक तिच्याकडे जास्तीचे पैसे तिच्या माहेरून आई-वडिलांकडून आणावयास सांगत असत. सासू सासरे देखील तिला नेहमी तिच्या आई-वडिलाकडून पैसे आणावयास आसत.पैसे न दिल्यास सासू-सासरे यांनी तिला बरेच वेळा हातापायाने मारहाण केली आहे.ती गरोदर असताना देखील तिला मारहाण केली होती.दीपक यांनी वारंवार माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. परंतु तिचे आई-वडील पैसे देण्यास असमर्थ असल्याकारणाने दीपक व त्याचे आई-वडील यांनी केला त्रास देणे सुरू केले.पती दीपक, सासू राधाबाई व सासरे हे तिला एकदा म्हणाले होते की, जर तू पैसे आणले नाही तर तिच्यावर खोटेआरोप करून जीवे ठार मारून टाकू आणि दीपकला दुसरी बायको करून देऊ. दीपकचे दुसरे लग्न केल्यास दीपकला हुंडा मिळेल.अशी धमकी दिली होती.दरम्यान दि.१ जुलै रोजी सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास अंकिता ही नेहमीप्रमाणे उठून स्वयंपाक घरात असताना किरायादार बळीराम उत्तम घुले याने सकाळी ५:४५ वाजण्याच्या दरम्यान चार्जर मागण्यासाठी दरवाजात उभे राहून विचारत असताना तिची सासू राधाबाई तिथे आली. तिने दरवाजा बाहेरून लावून घेतला बळीराम घुले व तिला घरात कोंडून घेतले.आणि पूर्वी खोटे आरोप करण्याची धमकी दिल्याप्रमाणे अनैतिक संबंध आहेत.असा खोटा आरोप केला. त्यानंतर सासू सासरे यांनी तिला सायंकाळी ठार मारण्याची धमकी देऊन जोला या गावी निघून गेले.दि.२ जुलै शनिवार रोजी सकाळी १०:०० ते ११:०० वाजण्याच्या दरम्यान केज येथील घरी दीपक हा घरी आला. दीपक सोबत त्याचा मामा लकुल बांगर, त्याचा मुलगा नाना बांगर हा देखील सोबत होता. दीपक हा जोरजोरात घराबाहेर उभा राहून आरोळ्या मारू लागला. आणि शिवीगाळ करू लागला तिने घाबरून घराचा दरवाजा उघडत नसल्याने घरावर चढून छतावरून घरात आला. तिला घराच्या बाहेर निघ असे म्हणाला. तसेच त्याने मारहाण करायला सुरुवात केली. घराच्या बाहेर रोडवर येऊन पुन्हा मारहाण करीत घरात घेऊन गेला. दीपक सोबत आलेले लकुल बांगर, व नाना बांगर हे दीपक यास अजून मारहाण करण्यास चिथावणी देत होते. दीपकने तिला घरात नेले व घरातील लाकडी पलंगावर लोटून अंगावर बसून तोंडावर उशी ठेवली. तिला मारून टाकण्याच्या उद्देशाने तोंडावर उशी दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नात असताना शेजारी राहणारे शिवकांत मुंडे हे घरात आले व त्यांनी त्याच्या पासून सोडविले.अंकिता हिने जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गु.र.नं.२७२/२०२० भादवि ३०७,४९८,(अ),३२३,३२४,५०४,५०६ आणि ३४ नुसार पती दीपक बबनराव ढाकणे, सासरा बबनराव भानुदास ढाकणे,सासू राधाबाई बबनराव ढाकणे,लकुल बांगर आणि नाना बांगर या पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दीपक यास ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावणीली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत.
चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेस जीवे मारण्याचा प्रयत्न
RELATED ARTICLES