बीड : फिर्यादी शहादेव महादेव लिंगसे रा. राहेरी ता.गेवराई यांना तपेनिमगाव येथील वाळूघाटावर हायवा टिपर लोडिंग करण्यावरून कोयत्याने मारहाण झाली होती. त्या मारहाण प्रकरणी तलवाडा पोलीस स्टेशनला त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालासाहेब मस्के, अर्जुन वाघ, अंकुश घाडगे सर्व रा. बीड यांच्याविरुद्ध दिनांक 07/06/2022 रोजी गु. र. न.98/2022 पोलीस स्टेशन तलवाडा येथे कलम 307, 324, 504, 34 भा. द. वि. अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अॅड. तेजस सुभाष नेहरकर यांनी आरोपी मार्फत अटकपूर्व जामीन मिळावी म्हणून फौजदारी जामीन अर्ज क्रमांक 532/2022 मा. जिल्हा न्यायाधीश बीड यांच्या कोर्टाने दाखल केला होता. आरोपीच्या वतीने भक्कम बाजूची मांडणी अँड. तेजस नेहरकर यांचा उत्कृष्ट युक्तिवाद ग्राह्य धरून त्या अर्जावर सुनावणी होऊन अटकपूर्व जामीन अर्ज मा. न्यायालयाने मंजूर केला आरोपीच्या वतीने ॲड.तेजस नेहरकर यांनी काम पाहिले.
कोयत्याने गंभीर वार केले प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर – ॲड. तेजस नेहरकर
RELATED ARTICLES