केज : तालुक्यातील चिंचोली माळी येथील दीपक नखाते वय ३० वर्षे या तरुणाचा विवाह झाल्यानंतर त्याला एक मुलगी झाली होती. मात्र मागील काही महिन्यापासून त्याची पत्नी ही मुलीला घेऊन तिच्या माहेरी राहत होती. तर दिपक हा त्याच्या आई-वडिलांकडे गावी रहात होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या आई वडील हे मजुरीच्या निमित्ताने बाहेरगावी होते. पत्नी नांदत नसल्याच्या कारणावरून आलेल्या निराशातून दीपक नखाते यानी टोकाची भूमिका घेतली.रविवारी दुपारी घरी कोणी नसताना घरातील कपडे व इतर वस्तू पेटवून देऊन राहत्या घरात लोखंडी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.रविवारी रात्री उशिरा या घटनेची मिळताच ठाण्याचे फौजदार राजेश पाटील,जमादार राम यादव, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, राजू गुंजाळ यांनी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. सोमवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून चिंचोलीमाळी येथे अंत्यसंस्कार आले. महादेव शिवाजी नखाते यांच्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तीस वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
RELATED ARTICLES