HomeUncategorizedराजर्षी शाहु विद्यामंदीर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात...

राजर्षी शाहु विद्यामंदीर येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

केज : आरक्षणाचे जनक आपल्या कृतीतून सामाजिक समतेचा संदेश देणारे आणि आपण छत्रपतींचे वंशज असून लोककल्याण हीच आपली जबाबदारी आहे अशा भावनेतून राज्यकारभार करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती स्वामी दयानंद प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर या शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती अॕड.राजेसाहेब देशमुख,संस्थेचे सचिव जी.बी.गदळे,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी.बी.चाटे,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रथम लोककल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला सर्व मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संस्थेचे सचिव गदळे जी.बी.यांची शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जीवन विकास शिक्षण मंडळाच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल राजर्षी शाहू विद्या मंदिर परिवाराच्या वतीने प्रमुख म्हणून अॕड.राजेसाहेब देशमुख उर्फ पापा यांच्या हस्ते ह्रदय सत्कार करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी अॕड.राजेसाहेब देशमुख यांनी समतेचे पुरस्कर्ते शाहू महाराज यांच्या कार्याचे स्मरण केले तसेच सचिवपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जी.बी.गदळे यांना शुभाशीर्वाद देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचलन व्ही.बी.यादव यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी.डी. चौधरी,एस.ए.डापकर, ए.डी.देशमुख,आर.एस.क्षीरसागर,जी.बी.डिरंगे व जे.आर.मस्के यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी एस.ओ.भुतडा, किशोर शिंदे व छत्रगुण चटप यांचीही उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments