केज : येथील पत्रकार सुंदर नाईकवाडे आणि सहशिक्षिका सौ.संगिता नवले-नाईकवाडे यांची कन्या स्वरूपा नाईकवाडे हिचे पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण संपले असून राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या १२० तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. यावेळी नाशिक जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात आणि स्वरूपा नाईकवाडे हिचे आई-वडील हे उपस्थित होते.या बाबतची माहिती अशी की, केज येथील पत्रकार सुंदर नाईकवाडे आणि शिक्षिका सौ.संगिता नवले-नाईकवाडे यांची कन्या स्वरूपा नाईकवाडे हिची एमपीएससीद्वारे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती. तिचे पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण संपले. त्यानंतर दि.२५ जून रोजी त्यांचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला.या दीक्षांत समारंभाला राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार यांच्यासह केजचे सुपुत्र आणि नाशिक जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या विशेष उपस्थितीसह नूतन पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे हिचे आई-वडील उपस्थित होते.परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक म्हणून स्वरूपा नाईकवाडे हिला नांदेड परिक्षेत्र मिळाले असून लवकरच ती नांदेड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात रुजू होणार आहे. तिच्या भावी कारकिर्दीला पत्रकार, शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मंडळी यांच्यासह केज तालुक्यातील अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे यांचा दीक्षांत समारंभ संपन्न
RELATED ARTICLES