बीड : आघूट मोहरली , पाऊस वेळेत आला . आता शेतकऱ्यांची पेरणीची वेळ झाली परंतु कृषी दुकानदार खत , बी -बियाणे यांचा तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांना चढ्या दराने विक्री करण्याच्या संभवता नाकारता येत नाही म्हणून केज तहसीलदारांना शिवसंग्रामच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावर्षी पाऊस वेळेत आल्याने शेतकरी आनंदी झाला आहे . शेतीच्या मशागती व पेरणीची कामे करण्यासाठी खत, बी -बियाणे याची खरेदी करत असतो परंतु नेमकं याच काळामध्ये कृषी दुकानदार खत -बियाणे याचा खाजगी तुटवडा निर्माण करुन शेतकरी बांधवाची अडवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही . परंतु जर एखाद्या दुकानाने शेतकरी बांधवांना वेठीस धरले तर अशा कृषी दुकानदाराचा शिवसंग्रामच्या वतीने खरपूस समाचार घेतला जाईल. त्यामुळे कृषी दुकानदारांनी शेतकरी बांधवास चढ्या दराने बियाणे विक्री करू नयेत तसेच खाजगी तुटवडा निर्माण करू नये . व या काळामध्ये शेतकऱ्यांना सांभाळून घेण्यात यावे त्याला वेळीच बियाणे उपलब्ध करून द्यावे असे आवाहन शिवसंग्रामच्या वतीने करण्यात येत आहे . आधीच मागील दोन वर्ष कोरोणामुळे सर्वांचीच कंबरडे मोडले आहेत यामध्ये सर्वात जास्त झळा शेतकऱ्यांना बसला आहे म्हणून शिवसंग्रामच्या वतीने सर्व कृषी दुकानदारास कळकळीची विनंती करण्यात येत आहे अन्यथा अशा तक्रारी प्राप्त झाल्यास शिवसंग्रामच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा शिवसंग्रामचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किसन दादा कदम व केज तालुका शिवसंग्रामच्या वतीने देण्यात येत आहे .याप्रसंगी केज शिवसंग्राम शहराध्यक्ष अशोक कदम, अशोक काळे,दया भोसले, अमर काका जाधव हे उपस्थित होते.
खत,बी-बियाणे चढ्या भावाने विक्री कराल तर ; शिवसंग्रामच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
RELATED ARTICLES