HomeUncategorizedनायब तहसीलदार हल्ला प्रकरणी आणखी एक आरोपी पोलीसांच्या ताब्यात.

नायब तहसीलदार हल्ला प्रकरणी आणखी एक आरोपी पोलीसांच्या ताब्यात.

केज : येथील नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्यावर कौटुंबिक वादातून कार्यालयात झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणी आणखी एका आरोपीला पोलीसांनी अटक केली.दि. ६ जून रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या दरम्यान केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्यावर त्यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ याने जीवे मारण्याच्या तसेच वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून तहसील कार्यालयाच्या आस्थापना विभागातील कक्षात जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या तक्रारी वरुन दि. ७ जून रोजी मधुकर वाघ याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२२/२०२२ नुसार भा.दं.वि. ३५३,३०७, ३३३ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सखोल चौकशी करून तपास करून तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी हल्लेखोरांच्या कटात सहभागी असणे आणि हल्ल्यास प्रवृत्त केल्याच्या कारणा वरून दुसरा आरोपी महेबूब शेख याला नाशिक येथून ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.महेबूब शेख याला तीन दिवसाची पोलीस कोठडी :- नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या वरील धारदार कोयत्याने खुनी हल्ला प्रकरणातील दुसरा आरोपी महेबूब शेख याला दि.२७ जून पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments