बीड : तालुक्यातील नेकनुर येथे ग्रामीण भागातील सर्वात मोठे स्त्री रुग्णालय असून हे रुग्णालय महिलांच्या संबंधित आजारावरील किचकट व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत असल्यामुळे परिसरातील जनतेला वरदान ठरत आहे.काल स्त्री रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिलाक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिराव फुले याजनेअंतर्गत डॉ. परमेश्वर डोंगरे यांनी अतिशय गुंतागुंतीची गर्भाशयाच्या पिशवीची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या केली यावेळी सूर्यकांत काळे ब्रदर, शिंदे सिस्टर तसेच तांत्रिक कामकाजामध्ये वैद्याकिय समन्वयक डॉ. दुर्गेश जोशी, अरोग्यमित्र रंजीत बांगर यांची टीम ने परिश्रम घेतले.
स्त्री रुग्णालय नेकनुर मध्ये होऊ लागल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया
RELATED ARTICLES