केज : तालुक्यातील नांदूर घाट येथे बुधवार रोजी संध्याकाळच्या सुमारास मधुकर निवृत्ती जाधव वय ७० वर्ष यांनी नांदुर घाट जवळ असलेल्या जांभळबेटामधील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली .गुरुवार सकाळी शेताकडे ये -जा करणाऱ्या लोकांना गळफास घेतलेली व्यक्ती दिसून आली.त्यानंतर पोलीसचौकी नांदुरघाट येथे कळवण्यात आले. त्यानंतर दहाच्या सुमारास नांदुर घाट पोलिस चौकीतील जमादार भालेराव व पोलीस नाईक रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.प्रेतास नांदुरघाट ग्रामीण रुग्णालय येथे पोस्टमार्टम साठी नेण्यात आले आहे .आत्महत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली हे अजूनही निष्पन्न झालेले नाही .परंतु बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.पुढील तपास जमादार भालेराव व पोलीस नाईक रशीद शेख करत आहेत.
नांदुरघाट येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
RELATED ARTICLES