HomeUncategorizedकेज पोलीसांनी पुन्हा एक रोडरोमियो धुतला ; कुटुंबीयावर आली नामुष्कीची वेळ

केज पोलीसांनी पुन्हा एक रोडरोमियो धुतला ; कुटुंबीयावर आली नामुष्कीची वेळ

केज : येथे शिकवणीला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडछाडीचा प्रयत्न करणाऱ्या एका बदमाशाला पोलीसांनी चांगलाच धुतला. पुन्हा तो रोडवर उभा राहून आगळीक करण्याची हिम्मत करणार नाही.केज येथे शिकवणीला जाणाऱ्या एका मुलीला मागील काहीदिवसांपासून एक रोडरोमिओ त्रास देण्याचा प्रयत्न करीत होता. ही माहिती त्या मुलीने निर्भीडपणे पालकासोबत येऊन गोपनीय रित्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिली. आणी तसेच त्याच्या दुचाकीचा नंबर पोलीसांना कळविताच क्षणाचाही विलंब न करता सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस नाईक अशोक नामदास आणी इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्या बदमाशाचा पाठलाग करून पकडले. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची ‘सरबराई’ केली. त्यामुळे आता तो रस्त्यात उभे राहण्याची देखील हिम्मत करू शकणार नाही. पोलीसांनी त्याच्या नातेवाईकाला बोलावून घेऊन त्यांची कानउघाडणी केली.”मुली आणी महिलांनी तसेच शाळेच्या आजू बाजूच्या व्यापारी बंधू,सुजान नागरिक, पत्रकार बंधू यांनी अशा प्रकारे जर कोणी आगळीक करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याचे नाव,फोटो,फोन नंबर किंवा वाहनाचा नंबर पोलिस स्टेशन केज मला स्वतः ला अथवा पोलीस अधिकाऱ्यांना अथवा स्टाफला कळवावेत. आम्ही त्यांच्या विरुद्ध मा.पोलीस अधीक्षक सर, मा.अप्पर पोलिस अधीक्षक,अंबाजोगाई आणी सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत सर यांच्यामार्गदर्शनाखाली कठोर कारवाई करू आणी माहिती देणारांचे नाव गुप्त ठेवले जाईल.“सहाय्यक पोलिस निरीक्षक –शंकर वाघमोडे, केज पोलिस स्टेशन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments