HomeUncategorizedपोक्सो कायद्यातील आरोपीला सश्रम जन्मठेपेची अर्धी शिक्षा व दहा हजार रुपये दंड

पोक्सो कायद्यातील आरोपीला सश्रम जन्मठेपेची अर्धी शिक्षा व दहा हजार रुपये दंड

केज : तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील आरोपी आण्णा उर्फ भाउराव प्रभाकर गदळे वय २६ वर्षे याला अंबाजोगाई येथील जिल्हा व सञन्यायालयाने जन्मठेपेची अर्धी शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पोलिस स्टेशन केज येथे गु.र.नं. ५४२/२०१८ कलम ३७६ (२)(१) भादंवी सह ३,४ पोक्सो,सत्र प्रकरण ३०/२०१८ अन्वये आरोपी आण्णा उर्फ भाऊराव प्रभाकर गदळे वय २६ वर्ष रा.दहिफळ वडमाऊली ता.केज यास मा.प्रमुख जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश साहेब- ३ अंबाजोगाई यांनी वरील आरोपीस पोक्सो कायद्याचे कलम.६ तसेच कलम ५११अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा कलम ३७६ (२) भादंवी द्वारे कलम २३५ (२) सीआरपीसी कायद्या अन्वये जन्मठेपेच्या अर्ध्या सश्रम कारावासाची कारावासाची शिक्षा व १०,००० रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महीने साधी कारावासाची शिक्षा दिली आहे. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस.एम. कदम,न्यायालयीन पोलिस अंमलदार एस.बी.सोनटक्के, सरकारी अभियोक्ता श्री एल.बी.फड यांनी न्यायालयात पुरावे सादर करुन सदर आरोपीला प्रमुख जिल्हा व सञ न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments