केज : शेत मोजून का देत नाही नाहीत अशी भांडणाची कुरापत काढून एका दांपत्यास काठीने मारून दुखापत केल्याची घटना पिंपळगाव ता.केज येथील शेतकरी अरुण कडुबा तांदळे वय ५० वर्षे हे दिनांक १९ जून रोजी १-०० वाजेच्या सुमारास त्यांच्या विडा शिवारातील शेतात असताना,विद्या विजय फड रा.बीड,सुरेश शिवाजी तांदळे रा. तांदळ्याचीवाडी,कृष्णा महारुद्र ढाकणे, रा.पिंपळगाव यांनी संगनमत करून शेत मोजून का देत नाहीत? अशी भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर कृष्णा ढाकणे व पांडुरंग ढाकणे यांनी काठीने अरुण तांदळे यांना मारहाण करून जखमी केले.तर त्यांच्या पत्नीस कृष्णा ढाकणे याने डोक्यात मारून मुक्का मार दिला.अशी फिर्याद अरुण ढाकणे यांनी दिल्यावरून विद्या फड, सुरेश तांदळे,कृष्णा ढाकणे, पांडुरंग ढाकणे या चार जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल आहे.
शेतीचा वादत दांपत्यास काठीने मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल
RELATED ARTICLES