HomeUncategorizedक्राऊड फंडीगच्या चौकशीमुळे केज तालुक्यातील सामाजिक संस्था धास्तावल्या

क्राऊड फंडीगच्या चौकशीमुळे केज तालुक्यातील सामाजिक संस्था धास्तावल्या

केज : क्राउड फंडींगच्या चौकशी मुळे केज तालुक्यातील सामाजिक संस्था धास्तावल्या असुन या चौकशीतुन अनेक सामाजिक संस्थाने पितळ उघडे पडणार आहे.सामाजिक काम करत असताना अनेकदा पैश्याचा प्रश्न उभा राहतो. सध्याच्या सोशल मिडीयाच्या जगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपण पैसा उभा करु शकतो.यालाच क्राऊड फंडींग असे संबोधले जाते.क्राऊड म्हणजे अनेक लोक व त्यांच्याकडुन आपल्या कामाची माहिती त्यांना देऊन पैसा उभा करणे. यात काही क्रांऊड फंडींग देणाऱ्या व्यक्तींनी आपली वेबसाईट तयार करुन त्यावर अश्या अनेक एनजीओ ज्यांच्याकडे ८० जी एफसीआरए आहे त्यांच्या कार्याची माहिती उपलब्ध करुन त्यांचे एक अकाउंट निर्माण केले जाते व त्यावर फंड मिळवला जातो. यात पैसा देणारा कोण आहे ? याची माहिती अनेकदा अनेकांना नसते.अनेकदा कोणीतरी युपीआय कोड स्कॅन करुनही पैसा टाकतो पैसा देणाराची भावना ही सामाजिक असते. की आपण कोणाला तरी मदत करत आहोत. अनेकदा या वेबसाईटवर डोनेशन देऊन आयकरातुन सुट मिळवण्यासाठी ८० जी चा वापरही केला जातो. यात दान देणाऱ्याला त्याच्या आयकरातुन सुट मिळते व एनजीओला पैसा मिळतो. म्हणजे दोघांचाही हेतु साध्य होतो. अश्या फंडींग निर्माण करुन देणाऱ्या अनेक वेबसाईट जगात निर्माण झाल्या. यात मिलाप , किटो अश्या अनेक वेबसाईट आहेत.यात तुमच्या संस्थेची माहिती वेबसाईटवर असते परंतु सदर संस्थेची माहिती योग्य आहे का ? संस्थेचे खरच काम आहे का ? का बोगस माहितीच्या आधारे पैसा उभा केला जात आहे याची शहानीशा कोणीही करत नाही. वेबसाईट वाले आपला व्यवसाय आहे या भावनेतुन एनजीओची माहिती मागवतात तर एनजीओ वाले फंड मिळणार आहे यासाठी खरी खोटी माहिती पाठवतात व यातुन निर्माण होणारा पैसा कोठे जातो? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. कारण अश्या प्रकारची क्राऊड फंडींग अनेक संस्थांना मिळालेली आहे. यात पैसा तर आला परंतु खरच त्या पैश्याचा योग्य विनीयोग झाला आहे का? याची माहिती घेणे व त्या पैशाचे योग्य आर्थीक ताळेबंद होणे गरजेचे आहे.अनेक सामाजिक संस्था आपल्याकडील फंडाचा योग्य वापर करत नाहीत असे अनेकदा दिसुन आलेले आहे. यात जर पैसा देणाऱ्याचे लक्ष असेल तर एनजीओ योग्य पध्दतीने काम करतात परंतु जर अश्याप्रकारे कोणीही विचारणार नसेल तर एनजीओ पैशाचा दुरुपयोग करतात असा आतापर्यंत अनेक संस्थांचा आनुभव आलेला आहे. अनेक सीएसआर फंडाचाही योग्य वापर केला जात नाही. यासाठी एनजीओ च्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवण्यासाठी शासनाने कोठेतरी नवीन यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण धर्मादाय आयुक्त हे केवळ एनजीओचे कागदपत्र संभाळणारी संस्था बनली आहे. कोणती एनजीओ योग्य पध्दतीने काम करते किंवा नाही हे पाहण्याचे काम धर्मदायचे नसल्याचे धर्मदाय कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीतुन स्पष्ट दिसुन येते .त्यामुळे एखादया एनजीओने फंडचा गैरवापर केला तरी त्या एनजीओवर कसल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही असेच अनेकदा दिसुन आले आहे. एनजीओ या पैसे कमवण्याचे साधन बनत चालल्या आहेत. नुकत्याच आयकर विभागाने एनजीओ ला मिळालेल्या निधीची माहिती एनजीओ कडुन मागवलेली आहे. यात ज्यांना ८० जी अंतर्गत सुट पाहीजे त्यांची माहिती एनजीओने आयकर विभागाला ३१ मे पर्यंत देणे बंधनकारक होते. यामुळे आता कोठे तरी एनजीओला चपराक बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकांच्या सामाजिक भावनाशी खेळणाऱ्या एनजीओंना आयकर विभागाने लक्ष पुर्वक बाजुला करणे आवश्यक आहे. व या एनजीओवर योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. कारण अनेक सीएसआर पैसा देऊन मोकळे होतात परंतु त्या पैशाचा योग्य विनीयोग झाला आहे का? हे पाहत नाहीत.खरतर सीएसआर ची पण जबाबदारी आहे की त्यांनी दिलेल्या पैश्याचे योग्य पध्दतीने विनीयोग झाला आहे का नाही? नसता अश्या सीएसआर वर देखील कार्यवाही होत असते.परंतु आजपर्यंत कोणताच कडक निर्णय शासनाने न घेतल्यामुळे एनजीओचे चांगलेच फावत आहे. क्राउड फंडींग मध्येही आता ज्या वेबसाईटच्या आधारावर क्राऊड फंडींग निर्माण झाली आहे त्या वेबसाईला त्यांना कोणी निधी दिला याची माहिती त्यांच्याकडुन इनकम टॅक्सने घेणे गरजेचे आहे. जेणे करुन भविष्यात क्राऊड फंडींग करणाऱ्या एजन्सीज देखील ज्या एनजीआोची मार्केटींग करत आहोत त्या योग्य आहेत का ? याची खातरजमा करतील. तसेच आपल्याला डोनेशन देणारे खरच योग्य व्यक्ती आहेत का ? याचीही माहिती घेतील.केवळ पैसा येत आहे म्हणुन क्राउड फंडींगचा व्यवसाय करणाऱ्या वेबसाईटवरही बंधने घालणे गरजेचे आहे. तसेच या क्राऊड फंडींगचा योग्य वापर केला आहे का? याबाबत ची लेखापरीक्षण चांगल्या एजन्सीकडुन होणे गरजेचे आहे. तसेच ज्या एनजीओचे मोठया प्रमाणात फंडींग आहे अश्या एनजीओचे लेखापरीक्षणही शासकीय यंत्रणेकडुन अथवा चांगल्या लेखापरीक्षकाकडुन होणे गरजेचे आहे.कारण यातुनही एनजीओचा कारभार चांगला होऊ शकतो.सध्या एनजीओची अवस्था एनजीओ “जिओ और ऐश करो “अशीच झालेली आहे. यात सुधारणे होणे गरजेचे आहे. शेवटी आयकर विभागाने आता अश्या एनजीओवर चपराक बसवणे गरजेचे आहे. कारण एखादया एनजीओवर जरी मोठी कार्यवाही झाली तरी भविष्यात सर्व एनजीओचा कारभार नक्कीच सुधारेल यात शंका नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments